उमेदवार पदवीधर मतदारांचे हात जोडून करत आहेत राम राम....मतदार विचारत आहे अहो पदवीधर संघाचे आमदार काय काय केले काम....?
उमेदवार पदवीधर मतदारांचे हात जोडून करत आहेत राम राम....मतदार विचारत आहे अहो पदवीधर संघाचे आमदार काय काय केले काम....? छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ निवडणूक: ४१ उमेदवार रिंगणात; सुशिक्षित मतदार विचारत आहेत जाब, परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी): विधानपरिषदेचा 'पदवीधर मतदारसंघ' हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील एक अत्यंत सुविद्य व वेगळा प्रयोग आहे. समाजातील उच्चशिक्षित वर्ग, सुशिक्षित तरुण, व्यावसायिक, शिक्षक आणि पदवीधरांच्या विशिष्ट अडीअडचणींना थेट विधिमंडळाच्या पटलावर वाचा फोडण्यासाठी या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. बेरोजगारांचे प्रश्न, एमपीएससी (MPSC) व युपीएससी (UPSC) परीक्षांमधील घोळ आणि विलंब, शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण, वाढत्या फी आणि अनुदानित-विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांचे प्रश्न, सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, पदवीधरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून धोरणात्मक निर्णय व कायदे करून घेणे ही या मतदारसंघातील आमदारांची प्राथमिक आणि महत्त्वाची जबाबदारी असते. छत्रपती संभाजी नगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा...