महापौर सय्यद इकबाल यांचा आशा वर्करांशी संवाद;

महापौर सय्यद इकबाल यांचा आशा वर्करांशी संवाद;

 महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

परभणी, दि. 9 (टिळक रत्न प्रतिनिधी)- : परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर सय्यद इकबाल यांनी महानगरपालिका अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांची सोमवारी (दि. 9) बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त सर्व आशा वर्कर महिलांना शुभेच्छा दिल्या.

या बैठकीस शिवसेना जिल्हा महिला संघटक प्रमुख सौ. अंबिकाताई डहाळे, सौ. वंदना कदम आदी महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या. आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

यावेळी महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करांनी गरोदर मातांची नियमित तपासणी, औषध व लसीकरणाबाबत जनजागृती करावी तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत उपलब्ध सुविधा घराघरांत पोहोचवाव्यात, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, घरात कचराकुंडी ठेवावी आणि घंटागाडी आल्यावर कचरा त्यात टाकावा याबाबत जनजागृती करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सौ. अंबिकाताई डहाळे यांनीही आशा वर्कर महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी आशा वर्कर नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्य करत असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त