Posts

Showing posts from September, 2021

परभणीच्या नागरिकानो पुढील मार्गाने जाऊ नका पुलावरून पाणी वाहत आहे

Image
परभणीत झालेल्या अतिवृष्टीमुळे निम्न दुधना व यलदारी धरण तसेच ढलेगाव दिग्रस मुदगल तरुगव्हान बंधारे तसेच झरी करपरा मासो व मुळी हे मध्यम प्रकल्प व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करणे चालू आहे त्यामुळे नागरिकांनी सद्य परिस्थितीत पुढील मार्गाने पुलावरून जाणे टाळावे ताडकल्स ते पूर्णा मार्गावरील धानोरा काळे पूल गंगाखेड अहमदपूर मार्गावरील इसाद पूल व राणीसावरगाव पूल सोनपेठ शिरसाला मारगावरील उखळी व उक्कडगाव पूल सेलू वालुर मार्गाने मोरगाव पूल परभणी ताडकळस मार्गाने पिंगळी पूल गंगाखेड पालम मार्गावरील मरडसगाव पूल  सदरील कमी उंची चे पूल आहेत ह्यावरून पाणी वाहत असल्याने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे कोणीही ह्या पुलावरून सद्य परिस्थिती मध्ये प्रवास करणे टाळावे करिता सूचित केले गेले आहे 

चोराने परभणीत खाजगी दवाखान्याच्या आय सी यु वॉर्ड मधुन रुग्णाचे तब्बल पाऊण लाखाचा ऐवजवर डल्ला

Image
आता चोरांनी दवाखाने सुद्धा सोडले नाहींत.....परभणीकरानो सावध रहा..!! परभणी (वार्ता) : आधीच परभणीत वाहन चोर मोबाईल चोर पाकिटमार भुरटे चोर बसस्थानक रेल्वे स्टेशन गर्दीचे ठिकाण वरून आपले हातसाफ करत आहेतच पण आता चोरांनी दवाखाने देखील सोडले नसल्याचे घटना समोर आली आहे  घटना अशी की अशोक अँभुरे ह्यांचे आईचे वय (55) उपचार करिता आपल्या गावावरून परभणीत बस स्टॅण्ड रोड भागातील परतानी दवाखाण्यात आय सी यु मध्ये दाखल झाले आज दि 6 सप्टेंबर 2021  पहाटेच्या  सुमारास  त्यांचे जवळील बॅग मध्ये पर्स च्या आत ठेवलेले कानातील डोरले गळ्यातील पोत व रोख रक्कम अंदाजे 55000 रुपये सकाळी बॅग मध्ये नसल्याचे दिसून आले  शोधाशोध केले असता रिकामी पर्स आय सी यु च्या वॉशरूम मध्ये आढळून आली सदरील घटनेची फिर्याद अशोक अँभुरे ह्यांनी नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे पुढील तपास चालू आहे  पोलिसांनी परतानी हॉस्पिटलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फूटेज व पर्स ताब्यात घेतले आहे लवकरच त्या चोरटे ताब्यात येण्याची शक्यता आहे  ते चोरटे कोण आहेत ह्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार संजय (बंडू) जाधव मेडिकल कॉलेज येत नाही तो पर्यंत करणार प्राणांतिक उपोषण

Image
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे ह्या करिता 7 सप्टेंबर पासून खासदार जाधव करणार प्राणांतिक उपोषण लढाई आता निकराच्या व हातघाईच्या टप्प्यावर आली आहे.असे सांगत खासदार संजय जाधव यांनी उपोषणाची घोषणा केली. परभणी ः `देह जावो अथवा राहो, पांडूरंगी दृढ भावो`, या अभंगातून शिवसेना खासदार संजय जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी  निकराची लढाई सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत. सात सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.  शुक्रवारी या आंदोलनात संत, महंत, वारकरी सांप्रदाय, लोककलावंत व खेळाडूंनी मोठ्या संख्येनेसहभागी होऊन आंदोलनाला पाठींबा दर्शवला.   शुक्रवारी (ता.तीन) या आंदोलनात जिल्ह्यातील संत, महंत, विविध वारकरी संस्थांचे वारकरी, लोककलावंत, खेळाडू, क्रीडा संघटक उतरले होते सायंकाळी आंदोलनस्थळी खासदार संजय जाधव ह्यांनी म्हंटले