चोराने परभणीत खाजगी दवाखान्याच्या आय सी यु वॉर्ड मधुन रुग्णाचे तब्बल पाऊण लाखाचा ऐवजवर डल्ला

आता चोरांनी दवाखाने सुद्धा सोडले नाहींत.....परभणीकरानो सावध रहा..!!



परभणी (वार्ता) : आधीच परभणीत वाहन चोर मोबाईल चोर पाकिटमार भुरटे चोर बसस्थानक रेल्वे स्टेशन गर्दीचे ठिकाण वरून आपले हातसाफ करत आहेतच पण आता चोरांनी दवाखाने देखील सोडले नसल्याचे घटना समोर आली आहे 

घटना अशी की अशोक अँभुरे ह्यांचे आईचे वय (55) उपचार करिता आपल्या गावावरून परभणीत बस स्टॅण्ड रोड भागातील परतानी दवाखाण्यात आय सी यु मध्ये दाखल झाले आज दि 6 सप्टेंबर 2021  पहाटेच्या  सुमारास  त्यांचे जवळील बॅग मध्ये पर्स च्या आत ठेवलेले कानातील डोरले गळ्यातील पोत व रोख रक्कम अंदाजे 55000 रुपये सकाळी बॅग मध्ये नसल्याचे दिसून आले 

शोधाशोध केले असता रिकामी पर्स आय सी यु च्या वॉशरूम मध्ये आढळून आली सदरील घटनेची फिर्याद अशोक अँभुरे ह्यांनी नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे पुढील तपास चालू आहे 

पोलिसांनी परतानी हॉस्पिटलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फूटेज व पर्स ताब्यात घेतले आहे लवकरच त्या चोरटे ताब्यात येण्याची शक्यता आहे  ते चोरटे कोण आहेत ह्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज