Posts

Showing posts from March, 2021

माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती 

Image
 माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती    मुंबई, दि. 30 (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून श्री. गणेश श्रीधर रामदासी यांची पदोन्नती झाली आहे. मंत्रालयात संचालक (प्रशासन व तांत्रिक कक्ष) या पदावर त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. श्री. रामदासी हे यापूर्वी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2001 मध्ये उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रमुखपदी झाली होती. केंद्रशासनात प्रतिनियुक्तीवर असताना माजी केंद्रिय राज्यमंत्री श्री. तारिक अन्वर तसेच माहिती व प्रसारण मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांच्यासोबत काम करण्याची त्यांना संधी लाभली होती. प्रसारभारतीमध्ये संचालक (प्रशासन) या पदावर त्यांची केंद्रशासनामध्ये सुमारे चार वर्षे प्रतिनियुक्ती होती. 

कोरोना लसीकरण नोंदणी बाबत वेबसाईट पत्ता व सर्व माहिती 

Image
कोरोना लसीकरण नोंदणी बाबत वेबसाईट पत्ता व सर्व माहिती  सा टिळक रत्न   सा.टिळक रत्न च्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपण covid-19 ची लस घ्यावी त्यासाठी आपण ऑनलाइन https://selfregistration.cowin.gov.in/ लिंक वर आपली नोंद करून घ्यावी. जर मोबाईल वर नॉदनी करताना अडचण येत असेल तर थेट लसीकरण केंद्रावर जाऊन देखील आपण नोंदणी करून लसीकरण करून घेता येईल ऑनलाईन नोंदणी वेळी  आपणास दवाखान्याची लिस्ट येते त्यात आपल्या घराजवळील दवाखाना निवडावा व त्या ठिकाणी लस घ्यावी. ज्यांचे वय 60 वर्षाच्या वर असेल अशा सगळ्यांना लस देण्यात येणार आहे. नोंदणी करते वेळेस आपण आधार कार्ड, पॅन कार्ड,मोबाईल हे सोबत ठेवावे. आपण नोंदणी आपल्या मोबाईलवर सुद्धा करू शकता किंवा दवाखान्यात मध्ये गेल्यानंतर नोंदणी करण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे  जर आपणास मनपा किंवा सरकारी दवाखान्यात लस घ्यायची नसेल तर खाजगी दवाखान्यात देखील केवळ 250 रुपयात सदरील लस आपण घेऊ शकता  शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना व त्यांच्या कुटुंबातील जवाबदार सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कर

चोरीचे तब्बल 29 फ्रीज़ परभणीत जप्त , वसमत रोड वरील भालेराव कॉम्प्लेक्स मध्ये केली कारवाई

Image
चोरीचे तब्बल 29 फ्रीज़ परभणीत जप्त , वसमत रोड वरील भालेराव कॉम्प्लेक्स मध्ये केली कारवाई  परभणी, (प्रतिनिधी) : इंदापुर येथून चोरीस गेलेले 29 फ्रीज़ स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. एक) येथील वसमत रस्त्यावरील भालेराव कॉप्लेक्समधून जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना भालेराव कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद वस्तु ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून श्री आलेवार, गुलाब बाचेवाड, नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे, शेख मोबीन, हरिचंद्र खूपसे, सानप, शेख अझर, श्री मुरकुटे, निळे, राठोड, जाधव आदि घटनास्थळी . त्यावेळी भालेराव कॉम्प्लेक्सचे मालक भालेराव यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी भेंडेकर नामक व्यक्तिस रूम भाड्याने दिली असल्याची माहिती त्यांनी पथकास दिली. श्री. तट यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी आदिनी भेंडेकर याच्या वडीलासमक्ष रूमची पाहणी केली. त्यावेळी त्यात वर्लपुल कंपनीचे 29 फ्रिज आढळले. याबाबत तेथील कोणीच काही माहिती सांगू शकले नसल्याने पथकाने याबाबत रांजणगाव पुणे येथील कंपनीशी संपर्क केला असता त