कोरोना लसीकरण नोंदणी बाबत वेबसाईट पत्ता व सर्व माहिती 

कोरोना लसीकरण नोंदणी बाबत वेबसाईट पत्ता व सर्व माहिती 

सा टिळक रत्न 


 सा.टिळक रत्न च्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपण covid-19 ची लस घ्यावी त्यासाठी आपण ऑनलाइन https://selfregistration.cowin.gov.in/ लिंक वर आपली नोंद करून घ्यावी. जर मोबाईल वर नॉदनी करताना अडचण येत असेल तर थेट लसीकरण केंद्रावर जाऊन देखील आपण नोंदणी करून लसीकरण करून घेता येईल ऑनलाईन नोंदणी वेळी  आपणास दवाखान्याची लिस्ट येते त्यात आपल्या घराजवळील दवाखाना निवडावा व त्या ठिकाणी लस घ्यावी. ज्यांचे वय 60 वर्षाच्या वर असेल अशा सगळ्यांना लस देण्यात येणार आहे. नोंदणी करते वेळेस आपण आधार कार्ड, पॅन कार्ड,मोबाईल हे सोबत ठेवावे. आपण नोंदणी आपल्या मोबाईलवर सुद्धा करू शकता किंवा दवाखान्यात मध्ये गेल्यानंतर नोंदणी करण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे 

जर आपणास मनपा किंवा सरकारी दवाखान्यात लस घ्यायची नसेल तर खाजगी दवाखान्यात देखील केवळ 250 रुपयात सदरील लस आपण घेऊ शकता

 शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना व त्यांच्या कुटुंबातील जवाबदार सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून covid-19 ची लस घ्यावी. आणि  आपले शहर करोना मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे यावे. ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन