Posts

Showing posts from January, 2023

मोबाईल अँपद्वारे ‘ई पीक’ नोंदणीसाठी तीन दिवसीय विशेष मोहीम

Image
 मोबाईल अँपद्वारे ‘ई पीक’ नोंदणीसाठी तीन दिवसीय विशेष मोहीम  ई -पीक नोंदणीचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे -  • गुरुवार ते शनिवार पीक नोंदणीसाठी विशेष मोहीम   परभणी, दि. 18 (टिळक रत्न प्रतिनिधी): रब्बी हंगाम 2022-23 ची ई-पीक पाहणी 100टक्के पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी गुरुवारपासून (दि. 19) तीन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून या विशेष मोहिमेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन 100 टक्के ई-पीक नोंदणी करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार गणेश चव्हाण पत्रकार परिषदेला उपस्थित होते. शेतकऱ्यांनी हे पीक पाहणी ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून ‘ई पीक पाहणी व्हर्जन -2’ हे ॲप ॲड्रॉईड मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. या तीन दिवस चालणाऱ्या विशेष मोहिमेमध्ये पीक पेराच्या नोंदणी घेताना काही तांत्रिक अडचणी आल्यास जिल्हा प्रशासनाकडून संबंधित तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली अ

1 जानेवारी 2023 रोजी जन्म झालेल्या कन्याचा त्यांच्या माँतांचा सन्मान उपक्रम संपन्न

Image
आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ वतीने 1 जानेवारी 2023 रोजी जन्म झालेल्या कन्याचा त्यांच्या माँतांचा सन्मान उपक्रम संपन्न परभणी परिवर्तन पॅनल च्या पदाधिकारीचा सहभाग  परभणी (प्रतिनिधी):-नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर दिनांक 1 जानेवारी 2023 जिल्हा रुग्णालय येथे जन्मलेल्या मुली व त्यांच्या मातेंना सन्मान करण्याचा उद्देश मुलींबद्दल समाजाची जागृती व्हावी मुलीच्या मातेला सन्मान मिळावा मुलीं कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा या बाबत जागृती व्हावी व महिलांबद्दल सन्मान वाटावा या उद्दिष्टाने आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ व परभणी परिवर्तन पॅनल च्या परभणी शहराच्या महिला शहराध्यक्ष श्रीमती जयश्री पुंडगे ताई यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे व परभणी परिवर्तन पॅनलचे परभणी जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख, परभणी जिल्हा उपाध्यक्ष सय्यद फारूक सय्यद लियाकत, परभणी शहर महिला अध्यक्ष जयश्री पुंडगे, शेख मुन्ना शामराव पुंडगे बबन अन्नामुळे वार्ड इन्चार्ज निर्मला काटकर डॉक्टर अस्मिता मोरे नर्स शेख हाफिजा बेगम ललिता घुगे, रोहिणी पुंडगे, द्रौपदी गायकवाड, गोपाळ साबळे, रव