Posts

Showing posts from March, 2024

जानकर यांनी बोर्डीकर, विटेकर यांचे बलिदान सार्थ ठरवावे

Image
 महायुतीचे जानकर यांनी विटेकर, बोर्डीकर, यांचे बलिदान सार्थ ठरवावे महायुतीच्या कार्यकर्तेची अपेक्षा ! परभणी (प्रतिनिधी ) - अनेक राजकीय घडामोडी नंतर अखेर महायुतीचा परभणी लोकसभा उमेदवार महादेव जानकर यांच्या रूपाने जाहीर झाला. परभणी लोकसभा उमेदवारी करिता राष्ट्रवादी पक्षाने प्रचंड आग्रही राहून राजेश विटेकर यांना समोर केले, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोर्डीकर उमेदवारी करिता कामाला लागले होते सोबत डॉ केदार खाटिंग देखील यांचे नावाची देखील चर्चा पण समोर आली त्यांनी देखील मतदार संघात भेटीगाठी वाढवल्या होत्या. असे सर्व महायुतीचा उमेदवारी करिता रणसंग्राम चालू असताना तिकडे महाविकास आघाडीकडून एकमेव उमेदवार संजय जाधव यांचे नाव घोषित केले गेले परंतु महायुतीचे उमेदवार कोण असणार हें स्पष्ट होत नव्हते अखेर आज महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल हें घोषित झाले  आज (31 मार्च ) परभणी येथे प्रताप देशमूख यांचे कार्यालयात महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे उमेदवार आपण स्वतः आहोत हें जाहीर केले व याला महायुतीच्या मित्र पक्ष यांच्या पदाधिकारी व राष्ट्रवादी(अजित पवार ) काँग्रेस पक्ष चे राजेश विटेक

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन

Image
आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘शिवगर्जना’ आयोजन • परभणी येथे 21 ते 23 मार्च रोजी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित ‘शिवगर्जना’ महानाट्याचे भव्य आयोजन • शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह पालकांनी देखील पहावा शिवचरित्राच्या भव्य सजीव देखाव्याची पर्वणी परभणी, दि.19 (प्रतिनिधी ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे. परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल, येथे दि. 21,22 आणि 23 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता आशिया खंडातील सर्वात मोठे ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे महानाट्य सर्व नागरिकांना विनामुल्य पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी 3 प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस करण्यात आले आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. सुमारे दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्या

वनामकृविचा 25 वा दीक्षांत समारंभ, 19 मार्चला परभणीत

Image
वनामकृविचा 25 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल रमेश बैस ऑनलाईन पध्दतीने कृषी मंत्री धनंजय मुंढे प्रत्यक्ष उपस्थित राहणार परभणी, (प्रतिनिधी) : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि.19) विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी दिली. शुक्रवारी (दि.15) विद्यापिठात दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक प्राचार्य डॉ.उदय खोडके, संशोधन संचालक डॉ.जगदीश जहागीरदार, कुलसचिव पी.के.काळे, नियंंत्रक प्रवीण निर्मळ, मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी देशमुख, डॉ.गजानन भालेराव, विद्यापीठ उपअभियंता डी.डी.टेकाळे, जनसंपर्क अधिकारी शंकर पुरी, प्रा.डॉ.प्रवीण कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस हे ऑनलाईन पध्दतीने उपस्थित राहणार असून ते ऑनलाईन उपस्थिती दर्शविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंंत्री धनंजय मुंडे, भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड

भारतात CAA कायदा लागू -पोर्टलवर अर्ज करून प्राप्त होणार नागरिक्तव

Image
 CAA कायदा आज पासून देशभरात लागू - केंद्र सरकारने अधिसूचना काढली नवी दिल्ली (वृत्त संस्था) - CAA नुसार अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान या देशातून आलेल्या 6 अल्पसंख्यांक शरणार्थी ज्यामध्ये हिंदू,बौद्ध, शीख, ख्रिश्चन,जैन, पारशी नागरिकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार याकरिता CAA नुसार नागरिक्तव प्राप्त करणे करिता ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करावा लागणार आहे - संसदेत डिसेंबर 2019 रोजी कायदा पारित झाला त्यास राष्ट्रपती ह्यांनी 12 डिसेंबर 2019 रोजी मंजुरी दिली होती.