वनामकृविचा 25 वा दीक्षांत समारंभ, 19 मार्चला परभणीत

वनामकृविचा 25 वा दीक्षांत समारंभ

राज्यपाल रमेश बैस ऑनलाईन पध्दतीने कृषी मंत्री धनंजय मुंढे प्रत्यक्ष उपस्थित राहणार



परभणी, (प्रतिनिधी) : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि.19) विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी दिली. शुक्रवारी (दि.15) विद्यापिठात दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक प्राचार्य डॉ.उदय खोडके, संशोधन संचालक डॉ.जगदीश जहागीरदार, कुलसचिव पी.के.काळे, नियंंत्रक प्रवीण निर्मळ, मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी देशमुख, डॉ.गजानन भालेराव, विद्यापीठ उपअभियंता डी.डी.टेकाळे, जनसंपर्क अधिकारी शंकर पुरी, प्रा.डॉ.प्रवीण कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस हे ऑनलाईन पध्दतीने उपस्थित राहणार असून ते ऑनलाईन उपस्थिती दर्शविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंंत्री धनंजय मुंडे, भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती कुलगुरु इंद्रमणि यांनी दिली. पुढे बोलतांना इंद्रमणि यांनी, सन 2021-22 आणि 2022-2023 या शैक्षणिक वर्षातील विविध विद्या शाखेतील एकूण 11 हजार 2 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीने अनुग्रहित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 29 विद्यापीठ सुवर्ण पदके, 19 दात्यांकडील सुवर्ण पदके, 2 रौप्य पदके, 20 रोख पारितोषिके वितरित करण्यात येणार असून 116 गुणवत्ता प्रमाणपत्र देखील प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती दिली. वनामकृविच्या स्थापनेपासून 24 व्या दीक्षांत समारंभापर्यंत 49 हजार 725 विध्यार्थी व आताचे 11 हजार 2 असे एकूण 60 हजार 727 विद्यार्थी पदवी, पदव्युतत्तर व आचार्य पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. कृषि, कृषि संशोधन आणि प्रशासनात उच्चपदांवर विद्यापीठातील विद्यार्थी नोकरी करत असून अनेकांनी कृषि उद्योगातून विद्यापीठाचे नाव देश पातळीवर नेले आहे. नुकत्याच झालेल्या कृषि सहायक परीक्षेत विद्यापीठातील 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने त्यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाली आहे. असे अनेक वरिष्ठ अधिकारी आज देशातील विविध ठिकाणी काम करत असताना त्याचे शिक्षण हे याच विद्यापीठात झाले असल्याचे कुलगुरुंनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन