बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीतील बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक यांना लाच घेताना अटक 

शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मागितली होती लाच

परभणी (प्रतिनिधी) :- परभणीतील नानलपेठ मधील बाल विद्या मंदिर माध्यमिक शाळेचा मुख्यधापक व लिपिक यांनी शाळेत प्रवेश मिळवून देतो म्हणून लाचेची मागणी केली लाच लुचपत विभागाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ; आरोपी क्रमांक एक मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद, वय 54 वर्ष, व्यवसाय कनिष्ठ लिपिक, बाल विद्या मंदिर माध्यमिक शाळा, नानलपेठ शाखा परभणी रा.भोई गल्ली परभणी. आरोपी क्रमांक दोन एकनाथ कच्छवे, वय 57 वर्षे, व्यवसाय मुख्याध्यापक बाल विद्या मंदिर(प्राथमिक), नानलपेठ शाखा,परभणी रा.जुना पेडगाव रोड, परभणी यातील तक्रारदार यांच्या मुलीचे पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी यातील दोन्ही आलोसे यांनी 7500/- रुपयांची लाचमागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली. दिनांक 28/06/2023 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी तडजोडीअंती 5,500/- रु पंचासमक्ष लाचमागणी केली. त्यापैकी 4,000/- रुपये दिनांक 03/07/2023 रोजी आलोसे  आरोपी मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद,यांच्याकडे देण्यास आलोसे एकनाथ कचवे यांनी सांगितले. उर्वरित 1,500/- रु दीड ते दोन महिन्यांनंतर आणून देण्यास सांगितले. आज दिनांक 03/07/2023 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे मो अब्दुल मो रशीद याने  4000/- लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली आहे. लाचेच्या रकमेसह आलोसे क्रमांक 01 यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले. आलोसे क्रमांक 02 यांनाही एसीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पो.स्टे.नानलपेठ,परभणी सुरू आहे.

सदरील कारवाई यशस्वी करण्याकरिता मार्गदर्शन डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड. यांनी केले तर सापळा/तपास अधिकारी श्री.बसवेश्वर जकीकोरे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो, परभणी. यांनी केला सापळा कारवाई पथक पोहेकॉ/मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, पोकॉ/ अतुल कदम, मोहम्मद जिब्राईल अँटी करप्शन ब्युरो, युनिट परभणी सहभागी झाले होते

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन