Posts

Showing posts from December, 2021

कृषी उडान योजनेत औरंगाबाद विमानतळाचा समावेश केंद्र सरकार सकारात्मक

Image
 कृषी उडान योजनेत औरंगाबाद विमानतळाचा समावेश केंद्र सरकार सकारात्मक खासदार इम्तियाज यांच्या मागणीला प्रतिसाद,  केंद्रीय नागरी विमान वाहतुकमंत्री यांची माहिती औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी ) :- केंद्रीय नागरी विमान वाहतूक सल्लागार समितीचे खासदार इम्तियाज जलील सदस्य आहेत. मागील आठवड्यात समितीच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतमाल (कृषी उत्पादन) कमीत कमी वेळेत देशातील विविध बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचावे याकरिता औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कृषी उडान-२.० योजनेत समावेश करण्याची मागणी केली. तसेच पत्र सुध्दा दिले होते. तसेच या मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय चिकलठाणा विमानतळाचा कृषी उडान-२.० योजनेत समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती केंद्रिय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कळवले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिनांक ५ डिसेंबरला दिलेल्या पत्रात नमुद केले होते की, औरंगाबाद जिल्ह

औरंगाबादच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य पालकमंत्री देसाई 

Image
 औरंगाबादच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य पालकमंत्री देसाई   शासन द्वीवर्षपूर्तीनिमित्त जिल्ह्यातील विविध विकासकामांची दिली माहिती    औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली दोन वर्षात राज्याने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणारही नाही, असा संदेश देत औरंगाबादच्या विविध विकासकामांना शासनाने गती देऊन ते पूर्णत्वास नेले आहेत. प्राधान्य देऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना दिल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज सांगितले. शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस अधीक्षक निमित गोयल, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई म्हणाले, की एमसीइडीमध्ये वस्तीगृह विस्तारीकरण केले आहे. यामध्ये आता 300 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण मिळणार आहे. 100 निवासी प्रशिक्षणार्थी याठिकाण