Posts

Showing posts from February, 2022

परभणी पालिका प्रभाग रचना कार्यक्रम घोषित

Image
 परभणी पालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर   परभणी (प्रतिनिधी) : सर्वाना उत्सुकता लागून राहिलेला विषय म्हणजे सार्वजनिक निवडणूक होणार की नाही पुढे ढकलल्या जाणार की विहित मुदतीत घेतल्या जाणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते निवडणूक आयोगाने सदरील निवडणूक करिता तयारी कार्यक्रम हाती घेतला आहे त्याकरिता प्रभाग रचना आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहेराज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणार्‍या तसेच नवनिर्मित अशा एकूण 208 नगरपालिकांच्या सदस्य पदाच्या सार्वजनिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम मंगळवारी (दि.22) जाहीर केला आहे. त्या प्रमाणे अ वर्गातील एकूण 16, ब वर्गातील 68 तर क वर्गातील 120 तसेच नवनिर्मिती 4 नगरपालिकांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवड आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकार्‍यांना एक अध्यादेश पाठवून प्रभाग रचनेसंदर्भात तपशीलवार असे मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे अ, ब व क वर्ग नगरपालिकांकरीता प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित मुख्य