परभणी पालिका प्रभाग रचना कार्यक्रम घोषित

 परभणी पालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर 


 परभणी (प्रतिनिधी) : सर्वाना उत्सुकता लागून राहिलेला विषय म्हणजे सार्वजनिक निवडणूक होणार की नाही पुढे ढकलल्या जाणार की विहित मुदतीत घेतल्या जाणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते निवडणूक आयोगाने सदरील निवडणूक करिता तयारी कार्यक्रम हाती घेतला आहे त्याकरिता प्रभाग रचना आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहेराज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणार्‍या तसेच नवनिर्मित अशा एकूण 208 नगरपालिकांच्या सदस्य पदाच्या सार्वजनिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम मंगळवारी (दि.22) जाहीर केला आहे. त्या प्रमाणे अ वर्गातील एकूण 16, ब वर्गातील 68 तर क वर्गातील 120 तसेच नवनिर्मिती 4 नगरपालिकांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवड आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकार्‍यांना एक अध्यादेश पाठवून प्रभाग रचनेसंदर्भात तपशीलवार असे मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे अ, ब व क वर्ग नगरपालिकांकरीता प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित मुख्याधिकार्‍यांनी दि. 3 मार्च 2022 पर्यंत संबंधित जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे आदेश बजावले आहेत. त्या प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयुक्तांद्वारे दि. 7 मार्च पर्यंत मान्यता बहाल केली जाईल. त्या पाठोपाठ प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशीयांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरीता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर पालिकांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्याकरीता 10 मार्च पर्यंत जिल्हाधिकार्‍यांद्वारे कारवाई केली जाईल. हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 10 मार्च ते 17 मार्च असा असेल. त्यावर सूनावनीस 22 मार्चपर्यंत जिल्हाधिकारी घेतील. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून राज्य निवडणूक आयोगास जिल्हाधिकारी दि. 25 मार्चपर्यंत अहवाल सादर करतील व निवडणूक आयोगाद्वारे अंतीम प्रभाग रचनेस 1 एप्रिल पर्यंत मंजूरी दिली जाईल. 5 एप्रिल रोजी अंतीम अधिसूचना प्रसिध्द केली जाईल, असे आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन