जानकर यांनी बोर्डीकर, विटेकर यांचे बलिदान सार्थ ठरवावे

 महायुतीचे जानकर यांनी विटेकर, बोर्डीकर, यांचे बलिदान सार्थ ठरवावे महायुतीच्या कार्यकर्तेची अपेक्षा !



परभणी (प्रतिनिधी ) - अनेक राजकीय घडामोडी नंतर अखेर महायुतीचा परभणी लोकसभा उमेदवार महादेव जानकर यांच्या रूपाने जाहीर झाला.

परभणी लोकसभा उमेदवारी करिता राष्ट्रवादी पक्षाने प्रचंड आग्रही राहून राजेश विटेकर यांना समोर केले, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोर्डीकर उमेदवारी करिता कामाला लागले होते सोबत डॉ केदार खाटिंग देखील यांचे नावाची देखील चर्चा पण समोर आली त्यांनी देखील मतदार संघात भेटीगाठी वाढवल्या होत्या.

असे सर्व महायुतीचा उमेदवारी करिता रणसंग्राम चालू असताना तिकडे महाविकास आघाडीकडून एकमेव उमेदवार संजय जाधव यांचे नाव घोषित केले गेले परंतु महायुतीचे उमेदवार कोण असणार हें स्पष्ट होत नव्हते अखेर आज महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल हें घोषित झाले 

आज (31 मार्च ) परभणी येथे प्रताप देशमूख यांचे कार्यालयात महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे उमेदवार आपण स्वतः आहोत हें जाहीर केले व याला महायुतीच्या मित्र पक्ष यांच्या पदाधिकारी व राष्ट्रवादी(अजित पवार ) काँग्रेस पक्ष चे राजेश विटेकर यांनी पाठिंबा घोषित केला. तर रामप्रसाद बोर्डीकर यांनी सोशल मीडिया माध्यमातून जानकर यांच्या नावाची महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शुभेच्छा दिल्या.

जानकर यांचा लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांचे विरोधात उभे राहून दुसऱ्या क्रमांकावर राहत साडेचार लाख मतदान मिळाले होते,आता 2024 रोजी समोर 2 वेळा लोकसभा खासदार असलेले संजय जाधव आहेत ही लढत देखील तुल्यबळ असणार आहे 

शेवटी एक वाक्य म्हणावे लागेल विटेकर, बोर्डीकर यांचे बलिदान सार्थ ठरवण्याची जिम्मेदारी जानकर यांचेवर आली आहे 

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन