चोरीचे तब्बल 29 फ्रीज़ परभणीत जप्त , वसमत रोड वरील भालेराव कॉम्प्लेक्स मध्ये केली कारवाई

चोरीचे तब्बल 29 फ्रीज़ परभणीत जप्त , वसमत रोड वरील भालेराव कॉम्प्लेक्स मध्ये केली कारवाई




 परभणी, (प्रतिनिधी) : इंदापुर येथून चोरीस गेलेले 29 फ्रीज़ स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. एक) येथील वसमत रस्त्यावरील भालेराव कॉप्लेक्समधून जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना भालेराव कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद वस्तु ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून श्री आलेवार, गुलाब बाचेवाड, नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे, शेख मोबीन, हरिचंद्र खूपसे, सानप, शेख अझर, श्री मुरकुटे, निळे, राठोड, जाधव आदि घटनास्थळी . त्यावेळी भालेराव कॉम्प्लेक्सचे मालक भालेराव यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी भेंडेकर नामक व्यक्तिस रूम भाड्याने दिली असल्याची माहिती त्यांनी पथकास दिली. श्री. तट यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी आदिनी भेंडेकर याच्या वडीलासमक्ष रूमची पाहणी केली. त्यावेळी त्यात वर्लपुल कंपनीचे 29 फ्रिज आढळले. याबाबत तेथील कोणीच काही माहिती सांगू शकले नसल्याने पथकाने याबाबत रांजणगाव पुणे येथील कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी सदरचा रजिस्ट्रेशन असलेला माल इंदापूर येथील चोरीस गेलेला आहे, अशी माहिती दिली. तसेच याबाबत इंदापूर पोलिस स्टेशनला 159 / 21 कलम 379 भा द वि प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचेही म्हटले. दरम्यान, येथील सर्व फ्रीज़ जप्त करण्यात आले असून नवामोंढा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन