महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवाजी भरोसे यांची निवड

महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवाजी भरोसे यांची निवड 


परभणी,दि.16(टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवाजी शेषराव भरोसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत.

         राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेशराव वरपुडकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

         दरम्यान, परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी शेषराव भरोसे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केला. यावेळी गटनेत्या तिरुमला खिल्लारे, मोकींद खिल्लारे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.

        दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत परभणी शहराच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे भरोसे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न