अमृत चे वतीने परभणीत 28 व 29 मार्चला महासेल चे आयोज

अमृत चे वतीने परभणीत 28 व 29 मार्चला महासेल चे आयोज  

वस्तु, कपडे, खाद्यपदार्थ, ज्वेलरी, कलात्मक वस्तु खरेदीची संधी

परभणी, दि. 17 (टिळक रत्न प्रतीनिधी ) :  ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 28 व 29 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक, लघुउद्योजक व विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती साहित्य, कलात्मक वस्तू, ज्वेलरी आदी उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने एकाच ठिकाणी मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा तसेच लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ देण्याचे काम करते, ज्यांना इतर शासकीय संस्था किंवा महामंडळांचा लाभ मिळत नाही. अशा जातींमधील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राम्हण, कोमटी, मारवाडी, ठाकूर,गुजराती, सिंधी, कायस्थ,जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधील  वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बीएसएनएल कार्यालयाच्या बाजूला, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. काटे यांनी केले आहे. 

*-*-*-*-*-*

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न