राज्यस्तरीय गतका स्पर्धा, प्रथम विजेते पदाचा मान परभणी जिल्ह्याला

राज्यस्तरीय गतका स्पर्धा, प्रथम विजेते पदाचा मान परभणी जिल्ह्याला



 परभणी, ( टिळक रत्न प्रतिनिधी) : - गतका असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित चौथी राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेचे येथील जिल्हा क्रिडा संकुलामधील बॅडमिंटन हॉलमध्ये 8 ते 10 ऑक्टोंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वसाधारण प्रथम विजेते पदाचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला. तीन दिवशीय आयोजित या स्पर्धेत एकूण 15 जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये परभणी, जळगाव, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, संभाजीनगर, सांगली, नांदेड, हिंगोली, सोलापूर, अकोला, नागपूर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होता. स्पर्धेत 250 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय जााधव तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल गतका असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य बलजिंदसिंग, अ‍ॅड. संभाजी देशमुख, संतोष नरवानी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना खासदार संजय जाधव म्हणाले, गतका हे खेळ पंजाबचे कल्चर आहे व महाराष्ट्रात शिवकालीन आहे. खेळात शेवटी हार-जीत असतेच परंतु, हारल्यानंतरदेखील नाउमेद न होता पुन्हा जोमाने प्रयत्न करावे, असे ते यावेळी म्हणाले. ही कला शिकविण्यासाठी मास्टर पांडुरंग आंबोरे हे परिश्रम घेत आहेत, ते कौतुकास्पद आहे, असे खासदार जाधव म्हणाले. ही कला अशीच जोपासली जावी व यासाठी कुठलीही मदत लागल्यास आपण ती देण्याचा प्रयत्न करु, असे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले. या स्पर्धेसाठी 15 जिल्ह्यातून आलेल्या संघापैकी तीन संघाची निवड करण्यात आली. यापैकी पहिला मान परभणी, दुसरा सातारा व तीसरा अहमदनगर जिल्ह्याने मिळविला. यावेळी मुख्य पंच म्हणून श्रृष्टी अंभुरे, ज्ञानेश्‍वर बनसोडे, सूर्यकांत मोगल, दत्ता गरुड यांनी काम पाहिले. प्रशांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर पंकज सोनी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी नारायण कदम, रोहिदास मोगल, गणेश चौधरी, ज्ञानेश्‍वर चौधरी, पाते, बालाजी मोगले, ओम परदेशी, पंकज परदेशी आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे आयोजन चरणजितसिंग सपरा, संतोष नारवानी, पांडूरंग आंबोरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन