परभणी मनपाच्या भारी नियोजनामुळे आठवडाभर परभणीकरांना प्यायला मिळणार नाही पाणी

 परभणी मनपाच्या भारी नियोजनामुळे आठवडाभर परभणीकरांना प्यायला पाणी मिळणार नाही



परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी)- हजारो कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना परभणीकरांसाठी आणलेली आहे. परंतु केवळ आणि केवळ शहर महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील काही भागात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. सुमारे १ लाख नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी मिळाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असून मनपा आयुक्तांनी आता तरी यात लक्ष घालावे, अशी मागणी ngrहोत आहे. शहर महानगरपालिकेचा ढिसाळ आणि गलथान कारभार परभणीकरांना सर्वश्रुत आहे. याचेच उदाहरण पून्हा एकदा पहायला मिळत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करण्यासाठी जो विद्युत पुरवठा लागतो त्यासाठीचे रोहित्र जळाले आहे. परंतु हे रोहित्र गेल्या १५ दिवसांपूर्वीच खराब झाले होते. याकडे मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, पाणीपुरवठा करण्यासाठी ४ पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. त्यातील केवळ २ पंप सुुरु असून एका पंपाची एक वर्षापासून दुरुस्ती सुुरू आहे. त्यामुळे आता सध्या केवळ एका पंपावरच पाणीपुरवठा सुरु आहे. त्यातील एकच मोटार चालू असल्याने पाणीपुरवठ्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. शहर महानगरपालिकेला याचे गांभिर्य नाही. तसेच एक मोटार सुुरू असून त्यातही सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. गेल्या ४ दिवसांपासून रोहित्र खराब झाल्याचे कारण सांगत पाणीपुरवठा बंद आहे. यासाठी मनपाच्या वतीने एक रोहित्रही आणण्यात आले. परंतु त्यालाही दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. ४ पंपापैकी एकाच पंपावरून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे हा ही पंप जर बंद पडला तर पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. केवळ 

नागरिकां च्या घरी हापसा किंवा बोअर आहेत त्यांना काय फरक पडणार नाही कोणीही नागरिक पाणी नाही म्हणून ओरड करणार नाही याची खात्री असल्याने सदरील पाणी पुरवठा बाबत  भारी नियोजन केले आहे पण असे विचार करून नळाला पाणी पुरवठा न करणे त्याबाबत योग्य ती उपाय योजना करणे अपेक्षित आहे मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी याकडे लक्ष देऊन हा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. 

 *आयुक्त नागरिकांना भेटणार केवळ आठवड्यातून एक तासच* 

काही दिवसांपूर्वीच शहर महानगरापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार तृप्ती सांडभोर यांनी स्विकारला आहे. त्यांनी पदभार घेतल्यानंतर सगळी कामे मार्गी लागतील, अशी परभणीकरांना अपेक्षा होती. परंतु या मनपा आयुक्तांनी सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास मनाई केली आहे. याउलट आयुक्त कार्यालयाच्या बाहेर गुरुवारी दुपारी केवळ १ तासच अभ्यागतांना भेटण्यास वेळ मिळेल, त्यातही रितसर परवानगी घेऊन यावे लागेल, अशी पाटी लावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी समस्या मांडायच्या कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन