खेळाडूंना हवे होते आज फिटनेस प्रमाणपत्र.... सिव्हिल हॉस्पिटल कर्मचारी म्हणतात ये उद्या....

 खेळाडूंना हवे होते आज फिटनेस प्रमाणपत्र.... सिव्हिल हॉस्पिटल कर्मचारी म्हणतात ये उद्या....शेवटी सिव्हिल सर्जन साहेबांनीच स्वतः बसून तयार करून दिले प्रमाणपत्र

 (कर्मचारी ह्यांनी नेहमी प्रमाणे करत राहीले टाळाटाळ व एकमेकांवर जबाबदारी ढकलत) 



परभणी (वार्ता) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी परभणीतील राष्ट्रीय खेळ मध्ये पाटणा येथे सहभागी होण्यासाठी जाणार आहेत नेशनल गेम मध्ये सहभागी प्रत्त्येक खेळाडुंना फिटनेस प्रमाण पत्र आवश्यकता असते ते काढण्यासाठी खेळाडू सिव्हिल हॉस्पिटल ओपीडी मध्ये दाखल झाल्या व रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आणि त्यांना हे सर्व झाल्यावर प्रमाणपत्र संध्याकाळी मिळेल याची अपेक्षा होती ,परंतु कर्मचारी वर्गाने नेहमी प्रमाणे आपले रूप दाखवले सदरील खेळाडूला विनाकारण प्रथम 1 तास विविध विभागात अधिकाऱ्याला भेटा त्यांना बोला आमचे कडे अधिकार नाहीत,हे असेच अर्ज हवा तसा अर्ज हवा असे बिनकामाची मागणी केली गेली,शेवटी 5:45 वा प्रमाणपत्र हवे असेल तर ये उद्या आज काही तुला प्रमाण पत्र मिळू शकत नाही असे उत्तर देऊन बाहेरचा रस्ता दाखवला ,घडलेला प्रकार खेळाडूंना योग्य वाटले नाही त्यांनी सिव्हिल सर्जन श्री लाखमवार साहेबांना भेटले तर त्यांनी घडलेला प्रकार पाहिला कर्मचाऱ्यांना बोलवून हे प्रमाणपत्र आज का देता येत नाही ह्याबाबत विचारणा केली तर नेहमी प्रमाणे उत्तर आले की हा अधिकारी रजेवर तो उद्या येईल ह्यावर श्री लाखमवार साहेबांनी स्वतःच प्रमाणपत्र देण्याचे तयारी पूर्ण करून सदरील खेळाडूला शुभेच्छा देत फिटनेस प्रमाण पत्र दिले पण ह्यावर एक लक्षात येते खेळाडूंना एवढा त्रास बाकीच्या नागरिकांचे हे कर्मचारी कसे वागणूक देत असतील आणि सर्व कामे सिव्हिल सर्जन करून देतील मग ह्या कर्मचारी वर्गाचे काम केवळ इकडे जा तिकडे जा संबंधित नागरिकांना सांगत राहणे आहे की काय

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन