कर्जाचा चेक देतो 5000 रुपये मागितली लाच , एसीबी ने धरले रांगेहात

कर्ज चेक देतो 5000 रुपये मागितली लाच एसीबी ने पकडले रंगेहात 

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या), परभणी मधील जिल्हा व्यवस्थापक व  क्लर्क ह्यांना लाच घेताना रांगेहात पकड़ले




परभणी (प्रतिनिधि) - येथील  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या), परभणी.  जिल्हा व्यवस्थापक, चंदू किसनराव साठे,(आलोसे 1) वय 56 वर्ष ,व  क्लर्क अविनाश प्रकाश मुराळकर (आलोसे 2) वय 35 वर्ष ,यांना 5000 रुपये ची लाच घेताना एसीबी पथकाने रांगेहात पकड़ले 

याबाबत सविस्तर वृत्त ऐसे की यातील तक्रारदार यांच्या आत्याचे नावे मंडप डेकोरेशन व्यवसायाकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या), कार्यालय परभणी येथे 1,00,000/- रुपये कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. दिनांक 13/07/2023 रोजी तक्रारदार व त्यांच्या आत्या हे आलोसे क्रमांक 01 यांना भेटून 1,00,000/- रुपये मंजूर कर्जाचा धनादेश देण्यासाठी विनंती केली असता यातील आलोसे क्र. 01 यांनी सदर धनादेश देण्यासाठी 5,000/- रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली होती. लागलीच आलोसे क्र 02 यांना तक्रारदार व त्यांच्या आत्या भेटल्या असता " कर्ज मंजुरीचा चेक देण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावेच लागतील " असे म्हणून त्यांनीही लाचेची मागणी केली होती अश्या स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली होती. आज दि.19/07/2023 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता आलोसे क्र 01 व 02 यांनी प्रथम 10,000/- रुपयांची मागणी केली आणि तडजोडीअंती 5,000/- रुपये स्विकारण्याचे मान्य केले. सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे क्र 02 यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष 5,000/- रुपये लाचेची रक्कम स्विकारली आहे. आलोसे क्र 01 व 02 यांना ताब्यात घेतले असुन पोलीस ठाणे नवा मोंढा, परभणी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

सदरिल प्रकरणात मार्गदर्शक डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड. 

पर्यवेक्षण अधिकारी अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, परभणी. सापळा/तपास अधिकारी सदानंद वाघमारे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो, परभणी. 

सापळा कारवाई पथकात पोह/चंद्रशेखर निलपत्रेवार, मपोह/सिमा चाटे पोकॉ/ अतुल कदम, कल्याण नागरगोजे अँटी करप्शन ब्युरो,परभणी सहभागी होते

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन