महाराष्ट्रातील मुलांनी संघर्षाची तयारी ठेवून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

विद्यार्थ्यांनी संघर्षाची तयारी ठेवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर 

केवळ 10% मराठी विद्यार्थी IAS परिक्षेत पात्र राहतात हे प्रमाण वाढले पाहिजे



परभणी, दिनांक 26 जून (प्रतिनिधी/ जिल्हा प्रतिनिधी) युपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या माध्यमातून तयार होणारे अधिकारी हे लाखो लोकांचे विधाते असतात .आज सर्वसामान्य माणसांच्या ाश्‍वत विकासासाठी चुकीच्या गोष्टीविरुद्ध संघर्षाची मोठी आवश्यकता निर्माण झाली असल्याने तशी तयारी ठेवूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यश मिळवावे ,असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले आहे . .मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित सात दिवसीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त केंद्रेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव होते. उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशेट्टी, डॉ. विजया नांदापूरकर, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ रोहिदास नीतोंडे ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. रामानंद व्यवहारे ,सहसमन्वयक प्रा. अभिजीत भंडारे, रजिस्टार श्री विजय मोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर विभागीय आयुक्त केंद्रेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अधिकाऱ्याला पद, पैशाची हाव नसावी. त्यांनी देशप्रेमातून कर्तव्य बजावले पाहिजे. सध्या अशा अधिकाऱ्यांची कमतरता आहे .कोणतेही तत्त्व नसलेले अनेक अधिकारी भरपूर असून त्यांच्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. अधिकारी म्हणून तत्त्वानुसार काम करता येत नसेल त्याचा काहीही उपयोग होत नाही. चुकीच्या गोष्टीविरुद्ध लढण्याची तयारी अधिकार्‍यांकडे दिसत नाही त्यामुळे व्यवस्था दूषित होऊ लागली आहे .आता याविरुद्ध लढण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी प्रतिपादित केली . मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यात दगड फोडणाऱ्याचा मुलगा, जालन्यातील ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा आयएएस झाल्याचे सांगून आयुक्त केंद्रेकर म्हणाले, युपीएससी, एमपीएससी परीक्षा बिलकुल अवघड नाहीत; परंतु महाराष्ट्रातून फक्त दहा टक्के विद्यार्थी आय ए एस साठी उत्तीर्ण होतात .हे प्रमाण वाढले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मूलभूत आणि भरपूर वाचन करावे .खोलात जाऊन प्रश्नांचे विश्लेषण करायला शिकावे. इंटरनेट, ग्रंथालयांचा वापर करावा .नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके वाचावीत .ज्या गोष्टीची आवड नाही त्या करू नये .आवड इथूनच उत्कृष्ट करिअर साध्य करता येते .आयुष्यात धोके पत्करण्याची लढण्याची तयारी ठेवा. तत्वाने काम केल्याने सर्वांचा शाश्वत विकास होऊ शकतो .भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय मुलाखत देता येत नाही हे लक्षात ठेवा. शारीरिक व मेंदूचा व्यायाम करा .मानसिक, वैचारिक क्षमता वाढवून रागाचे योग्य व्यवस्थापन करा. यशासाठी आत्मबळ आवश्यक असते ते वाढविण्यासाठी देवाला माना. असे अनेक सल्ले विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिले. आपले विद्यार्थी दशेतील तसेच अधिकारी म्हणून काम करतानाचे वेगवेगळे अनुभव सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले की ,विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत . त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठे होण्याचा प्रयत्न करावा. स्वतःसह समाजाचे आणि देशाचे भवितव्य घडवावे .स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्वतःचे ,समाजाचे आणि देशाचे भवितव्य घडविण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांना आहे .मानसन्मान ,समाजसेवा, करियर या सगळ्या गोष्टी यामधून साध्य होत असतात .याचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कष्ट आणि मेहनतीने करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी यावेळी केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. रामानंद व्यवहारे यांनी आभार प्रदर्शन केले. मार्गदर्शन शिबिर एक जुलैपर्यंत चालणार असून ,यु पी एस सी उत्तीर्ण कुणाल चव्हाण ,यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ ,उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे ,पीएसआय अरुण डोंबे ,सॉफ्ट स्किल ट्रेनर संजय मगर यांची ऑनलाईन व्याख्याने होणार आहेत .दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ऑनलाईन होणाऱ्या या शिबिरातील व्याख्यानांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ,असे आवाहन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव ,उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी ,उपप्राचार्य डॉ. विजया नांदापूरकर ,आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. रोहिदास नितोंडे ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. रामानंद व्यवहारे ,सहसमन्वयक प्रा. अभिजीत भंडारे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन