लालपरीचा अमृत महोत्सव वैजापूरात उत्साहात 

लालपरीचा अमृत महोत्सव वैजापूरात उत्साहात 



(छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या शहरात लालपरीच्या (एस, टी, बस) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ७५ वर्षे झाल्या प्रित्यर्थ  वैजापूर बस समध्ये  वाहक, चालक , कर्मचारी, अधिकारी यांनी ७५ वर्षावरील प्रवाशांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन केले. महामंडळच्या लौकिकासाठी  प्रवाशांना सौजन्यपूर्ण सेवा पूरऊ, मंडळाचे व बसचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही. महामंडळाच्या सर्वांगीण वृद्धि व विकासासाठी  सर्वतोपरी प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा त्यांना  माजी शिक्षणाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी दिली. लालपरीच्या ७५ वर्षाचा प्रवास कथन केला. आगार प्रमुख किरण धनवटे यांच्या उपस्थितीतीत हा कार्यक्रम झाला. त्यांनी ही प्रवाशांना माहिती दिली. दीप प्रज्वलन, प्रवाशांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार, मिठाई वाटप कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले. या प्रसंगी स्वप्नील पाडवी, वाहतूक निरीक्षक सतीश बावस्कर, वाहतूक सहाय्यक भाऊसाहेब गरुड, लेखाधिकारी किरण राऊत, पंढरीनाथ जाधव, पंडित जानराव, जोगेंद्र ठाकूर, वरिष्ठ लिपिक आजीनाथ मुळे, अपराध शाखेचे प्रकाश रामटेके, वाहतूक नियंत्रक सोमीलाल पवार, संदीप सूर्यवंशी, गिरी , खैरनार, लक्ष्मण साळुंके, एस, गंगवाल, आरती जाधव, वैशाली साठे, सचिन राऊत, विशाल पगारे, भगवान सोनवणे, संतोष गंगावणे, प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( आगार प्रमुख किरण धनवटे, धोंडीराम राजपूत,प्रकाश रामटेके, सोमीलाल पवार, भाऊसाहेब गरुड व ईतर फोटोत दिसत आहेत.)   

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन