शेतकरीवर्गाला फायदेशीर,वनामकृवित द्रवरूप जिवाणू खते विक्रीकरिता उपलब्ध

 

वनामकृवित द्रवरूप जिवाणू खते विक्रीकरिता उपलब्ध

जिवाणू खतांमुळे पिकांना दिलेल्‍या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होऊन पिक उत्‍पादनात होते वाढ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत अखिल भारतीय मृद जैव विविधता-जैविक खत प्रकल्पामध्ये विविध पिकांसाठी द्रवरूप जिवाणू खते १८ मे पासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत, द्रवरूप जिवाणू खताचे दर रु. ३७५/- प्रति लिटर असुन यात रायझोबीयम, अझोटोबक्टर, स्फुरद विरघळवीणारे / वहन करणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळवीणारे जिवाणू खत, गंधक विघटन करणारे व जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) व अझोटोफॉस (अझोटोबक्टर, व पीएसबी मिश्रण) आदींचा समावेश आहे. 

पिकांना दिलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होण्यास जिवाणू खतांमुळे मदत होते. त्यात रायझोबीयम या नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूमुळे सोयाबीन, मुग, हरभरा, भुईमुग, तूर, उडीद आदी पिक उत्पादनात २० टक्क्यापेक्षा जास्त वाढ होते. अझोटोबक्टर या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात १० ते २५ टक्क्यापर्यंत वाढ होते. तसेच तृणधान्य, गळीतधान्य, भाजीपाला, फळझाडे, बटाटा, ऊस, कापूस, हळद, आले, फुलझाडे आदी पिकांसाठी अझोटोबक्टर, पीएसबी व पालाश विरघळवीणारे जिवाणू खत (बायो-एनपीके) यांचे एकत्रित मिश्रण वापरता येते, अशी माहिती डॉ. अनिल धमक यांनी सांगितले.

द्रवरूप जिवाणू खते वापरण्याच्या पध्दती

बीजप्रक्रिया : एकदल पिके म्‍हणजेचे ज्वारी, तूर, बाजरी, मका, कापूस, गहू, साळ, आदी पिकांमध्‍ये अझोटोफॉस (अझोटोबक्टर व पीएसबी मिश्रण) हे जीवाणु संवर्धन वापरता येते. सदर २०० मिली जिवाणू संवर्धने प्रती १० किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी.

द्विदल पिके म्‍हणजेचे सोयाबीन, भुईमुग, तूर, मूग, उडीद, हरभरा इत्‍यादी मध्‍ये रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) हे जीवाणु सवंर्धन वापरता येते. हे जीवाणु संवर्धन सोयाबीन व भुईमुग करिता १०० मिली जिवाणू संवर्धने प्रती १० किलो तर तूर, मूग, उडीद, हरभरा ई. करिता २०० मिली जिवाणू संवर्धने प्रती १० किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी.

ठिबक सिंचनाद्वारे बायो-एनपीके:  हे जीवाणु सवंर्धन हळद, ऊस, केळी, आले, टरबूज, खरबूज, फळझाडे आदी फळपिकांकरिता उपयुक्‍त असुन एकरी २ लिटर द्रवरूप जिवाणू संवर्धने वेंचुरी टॅंक मध्ये टाकून पिकास द्यावे.

उभ्या पिकास पिकाच्या मुळा भोवती बायो-एनपीके हे जीवाणु संवर्धन देता येते. २०० मिली द्रवरूप जीवाणू संवर्धणे १५ लिटर नोझल काढलेल्या पाठीवरच्या फवार्‍याच्या सहाय्याने मुळा भोवती आळवणी करावी. एक एकरासाठी १० फवार्‍याच्या टाक्या किंवा २ लिटर प्रती एकर याचा वापर करावा.  

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन