शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही CAA, NRC विरोधात महिलांचा ठिय्या आंदोलन

दिल्लीच्या शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही CAA, NRC विरोधात महिलांचा ठिय्या आंदोलन

सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात गेल्या महिनाभरापासून महिलांचे आंदोलन सुरू आहे. आता याच धर्तीवर मुंबईतही महिलांनी ठिय्या सुरू केलं आहे.

मुंबई : दिल्लीप्रमाणेच मुंबईतील महिलादेखील एनआरसी आणि सीएएविरोधात आता रस्त्यावर उतरल्या आहे. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून शेकडो महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. महिलांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पुरुषदेखील या आंदोलनात उतरलेत. आंदोलनाची तीव्रता पाहता इथे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याचं आंदोलक महिलांनी म्हटलंय.

एकीकडे दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात महिलांचे गेले काही दिवस सीएए आणि एनआरसी विरोधात अविरत आंदोलन सुरू असताना मुंबई मधील महिला देखील यातून प्रेरित होऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून शेकडो महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. महिलांचा या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तितक्याच प्रमाणात पुरुष देखील या ठिकाणी आंदोलनात उतरले आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. हातात तिरंगा आणि फलक घेत या महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत शाहीनबाग प्रमाणेच आम्ही देखील ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन