अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला
महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत नामफलक शिवसेनेच्या तीव्र आक्षेपानंतर तात्काळ हटविला परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील स्मशान भूमी जवळील घटना परभणी,दि.27(टिळक रत्न प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या वसमत रस्त्यावरील एका चौकात काही व्यक्तींनी अचानक अनाधिकृतपणे लावलेल्या नामफलकावर शिवसेनेच्या पदाधिकार्यांसह संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर महापालिका प्रशासनाने तो नामफलक हटविला. गेल्या काही महिन्यांपासून काही व्यक्ती किंवा संस्थांकडून परस्परच पाट्या लावून शहरातील चौकांचे, रस्त्याचे नामकरण करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. असाच एक प्रकार वसमत रस्त्यावर स्मशानभूमीजवळ अलि कॉर्नर नावाचा एक नामफलक काही व्यक्तींनी रातोरात झळकवला. सोमवारी तो प्रकार निदर्शनास आल्याबरोबर शिवसेनेच्या संतप्त पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी त्या अनाधिकृत फलकावर तीव्र आक्षेप नोंदविला व महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे धाव घेतली. स्मशानभूमी परिसरातील वसमत रस्त्यावरील अली कॉर्नर हा फलक पूर्णपणे अनधिकृत असल्याचे नमूद करत, त्याविरुद्ध ...
Comments
Post a Comment