परभणीत लग्न सोहळा रीतसर परवानगी घेऊन घरच्या घरीच करावा - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर

परभणीत लग्न सोहळा घरच्या घरीच करायचा तेही 10 ते 15 जनांच्या उपस्थितीत - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर 
परभणी (प्रतिनिधी):- परभणीत कोरोना विषाणू संसर्ग झालेले रुग्णांची वाढती संख्या पाहता ह्याचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने परभणीचे जिल्हाधिकारी यांनी आदेश 
जारी केले आहेत त्यात विवाह सोहळा हे घरच्या घरीच 
करावेत आणि तेही परिवारातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत असे आदेशात नमूद केले आहे.
परभणी ग्रीन झोन कडे वाटचाल चालू असताना अनलॉकचे प्रयोग सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ सुरू झाली आता परभणीत एकूण 149 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यातील 94 रुग्ण उपचार घेतल्याने बरे झाले आहेत
पण दररोज हा रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहून जिल्हाधिकारी यांनी गर्दी होणाऱ्या बाबींकडे लक्ष घातले आहे.
त्यात विवाह सोहळ्यात देखील गर्दी होऊन कोणासही कोरोना लागण होऊ नये याकरिता विवाह सोहळे हे घरातच साजरे करावेत आणि सोहळ्यात मोजकेच 10 ते 15 जण असावेत त्यांची आधी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घ्यावी याकरिता उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन)  बी एच बिबे  यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे विवाह सोहळ्याचे रीतसर परवानगी घेऊन घरच्या घरीच सोहळे करावे असे परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कळवले आहे 

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन