भारतातील अयोध्या खोटी,खरे राजकुमार श्रीराम नेपाळी

भारतातील अयोध्या खोटी,खरे राजकुमार श्रीराम नेपाळी
म्हणे खरी अयोध्या नेपाळ मध्ये आहे - आणि मोदी नेपाळची राजसत्ता उधळू पाहत आहेत - नेपाळ पंतप्रधान के पी एस ओली

दिल्ली (वृत्तसंस्था):- भारतातील अयोध्या खोटी असून श्री राम मूळचे नेपाळी होते भारताने नेपाळवर सांस्कृतिक आक्रमण मोडतोड करून बनावट अयोध्या तयार केली आहे, असा जावई शोध नेपाळचे पंतप्रधान यांनी लावला आहे. भारताने ऐतिहासिक सत्याची मोडतोड केली राजकुमार श्री राम यांचे सीतामाई सोबत विवाह झाला पण तो नेपाळमधील राजकुमार श्रीराम यांच्यासोबत, भारतातील राजकुमार सोबत नाही तसेच खरी अयोध्या ही नेपाळ मधील बिरजगंज पासून पश्चिमेला आहे. जर अयोध्या भारतात होती असे मानले तर मग तेथील राम नेपाळ येथील जनकपूर मध्ये कसे काय आले  सगळे बनावट आहे असे हास्यास्पद विधान नेपाळ मध्ये त्यानि त्यांच्या निवासस्थानी भानूभक्त आचार्य यांचे जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.
त्यांनी असेच खळबळजनक विधान काही दिवसांपूर्वी पण केले होते की भारतातून येत असलेला कोरोना विषाणू संक्रमण हे चिन इटली च्या कोरोना संक्रमनपेक्षा घातक आहे  तसेच भारत मला सतेपासून दूर करण्याचा कट करत आहे.
पंतप्रधान ओली यांच्या या अशा व्यक्तव्या मुळे भारत नेपाळ सम्बन्ध खराब होत आहेत त्यांनी पंतप्रधान ओली यांनी अशी तणाव निर्माण होतील विधाने करू नयेत असे नेपाळचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे कमल थापा यांनी म्हणटले आहे.
 

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज