परभणीत सोमवार पासून व्यवहार सुरळीत चालू होणार - पालकमंत्री नवाब मलिक

परभणीचे पालक मंत्री नवाब मलिक यांनी केली परभणी अनलॉक ची घोषणा - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे कामगिरीवर व्यक्त केले समाधान 

परभणी 17 जुलै (प्रतिनिधी) - आज परभणीत कोरोना 19 संदर्भात आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलेले पालकमंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी परभणीत संचारबंदी उठवली जाईल सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यास परवानगी असेल पण कोरोना 19 च्या बाबतीत आरोग्य विभागाने सांगितलेल्या सर्व दक्षता उपाय करून घेऊन सर्वांनी आपआपले व्यवहार करायचे आहेत असे त्यांनी घोषित केले.लवकरच जिल्हाधिकारी याबाबत पत्रक काढून आदेशीत करतील.
तसेच परभणीत कोरोना 19 विषाणूचा संसर्ग थोपवण्यात जिल्हाधिकारी व प्रशांसन अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस डॉक्टर आरोग्य कर्मचारी व कोविड वॊरीअर यांच्या अथक परिश्रमाने कोरोना 19 चा धोका आपल्यापासून दूर राहिला आहे.नागरिकांनी देखील सहकार्य केले, आता जे रुग्ण आढळून येत आहेत ते बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातून प्रवास करून येथे आले आहेत त्याच्या वर सुद्धा उपचार केले गेल्याने त्या रुग्णांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होताना दिसत आहे ह्यात स्थानिक नागरिक सुरक्षित राहिले ही गोष्ट दिलासादायक बाब आहे.
तसेच कोरोना 19 बाधित रुग्णांच्या जेवणाच्या व पुरवण्यात येत असलेल्या सुविधामध्ये गडबड याबाबत प्राप्त तक्रारी वर खुलासा केला की जेवण पुरवठादार यांना देण्यात येणाऱ्या शुल्क वाढवून देण्याचे नियोजन केले गेले आहे आता जेवणाचा दर्जा सुधारला जाईल, तसेच संसर्गजन्य कक्षात रुग्णांना असुविधा होत आहेत यावर सगळे साधन असताना ते रुग्णांना देण्यात येते की नाही याकरिता कक्षात व रुग्णालयात CCTV लावण्यात येणार आहेत यावर जिल्हाधिकारी यांची 24 तास नजर असंणार आहे काही  आणि रुग्णांना काही लागल्यास ते या माध्यमातून सम्पर्क करून मदत मागू शकतात अशी यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर आजून ज्या कोणत्याही कोरोना बाधित रुग्णांस वाटते की आपल्या घरातच जागा आहे तर अशा रुग्णास त्याच्या राहत्या घरी होमकॉरनटाईन करण्यात येईल हे करताना त्याच्या घरच्या भिंती वर अथवा गेटवर दर्शनी फलक लावला जाईल व त्यास काही अत्यावश्यक साहित्य व उपचार हे दिले जातील बाकी तो रुग्ण घराबाहेर पडणार नाही उपचार सम्पल्यावर त्यास सुट्टी नन्तर मुक्त केले जाईल..


Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन