सेंद्रिय शेती चे प्रमाणीकरण करून घेण्याचे शेतकरी व शेतकरी गट यांना आवाहन

सेंद्रीय शेती करणारे शेतकरी व शेतकरी गट यांनी त्वरित प्रमाणीकरण करून घेऊन - कृषी विकास योजनेचा लाभ घ्यावा

परभणी (प्रतिनिधी):- सेंद्रीय शेती करणारे शेतकरी ,शेतकरी गट यांनी आपल्या सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करून कृषिविकास योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परभणी जिल्हात डोंगराळ व पारंपारीक क्षेत्रात रासायनिक खते/किटकनाशके यांचा वापर टाळुन पुर्ण्पणॆ सेंद्रीय पध्दतीने शेती केली जाते. अशा सेंद्रीय शेतीचा अवलंब करणा-या सलग क्षेत्र/गाव तसेच परंपरागत कृषि विकास योजनामध्ये समाविष्ठ नसलेले भागातील वैयक्तिक शेतकरी/छोटॆ शेतकरी गट त्यांचे कडील सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र केंद्र शासनाच्या परंपरागत कृषि विकास योजनांर्तगत सेंद्रीय प्रमाणिकरण करण्यात येणार आहे.सदरील योजना मध्ये समाविष्ठ होण्यासाठी यापुर्वी शासनाच्या कोणत्याही सेंद्रीय शेती योजनामध्ये समाविष्ठ नसलेल्या तसेच कोनत्याही प्रकारचे प्रमाणिकरण न केलेल्या  शेतक-यांने आपले नाव, गाव, आपले एकुण क्षेत्र व सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र,संपर्क क्रमांक समाविष्ठ असलेला  आपला विनंती अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्या दि.10 जुलै 2020 रोजी पर्यंत कार्यालयात सादर करावा.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन