परभणीत मनपाच्या कल्याण मंडपम मध्ये कोरोना-19 रुग्ण विलगिकरण कक्ष निर्माण होण्याची हालचाल सुरू

परभणीत मनपाच्या कल्याण मंडपम मध्ये कोरोना-19 रुग्ण विलगिकरण कक्ष निर्माण होण्याची हालचाल सुरू 
- विलगिकरण कक्ष निर्मितीस भाजपा नगरसेविका उषा झांबड यांनी केला विरोध 
परभणी (प्रतिनिधी):- परभणी कोरोना 19 मुक्ततेकडे वाटचाल करत ग्रीन झोन मध्ये येत असताना अनलॉक प्रक्रिया सुरू केली गेली आणि परभणीत बाहेर गावावरून आलेल्या लोकांना कोरोनाच्या लागण झाल्याचे निदर्शनास आले पाहता पाहता परभणीत 149 रुग्ण संख्या झाली यात 94 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आता हे सर्व करताना वाढ होत असलेली रुग्ण संख्या व संशयित नागरिकांकरिता जिल्हा रुग्णालय व आय टी आय तसेेेच अक्षदा मंगल कार्यालय रेणुका मंगल कार्यालय कमी पडू लागल्याने परभणी मनपा च्या कारेगाव रोड भागातील जायकवाडी वसाहत प्रभाग 5 मधील कल्याण मंडपम या मंगल कार्यालयात विलगिकरण कक्ष निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या ,पण ह्याच प्रभाग 5 मधील भाजपच्या नगरसेविका उषा झाम्बड यांनी विरोध दर्शविला आहे त्यांनी जिल्हा रुग्णालय व आय टी आय मध्ये विलगिकरण कक्षात कोणत्याही सुविधा रुग्णांना देण्यात येत नाहीयेत त्यामुळे रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना त्रास झाला तसेच कल्याण मंडपम परिसरातून नागरी वस्ती दाट आहे तेथेच लहान मुलांना लसिकरण करण्याचे केंद्र आहे तसेच नागरिकांना बाहेर जाण्यासाठी epass करिता कक्ष आहे सतत नागरिकांची वर्दळ असते येथे रस्त्यावरून हजारो नागरिक ये जा करत असतात जर विलगिकरण कक्ष येथे सुरू झाला तर आजून गर्दी वाढेल व कोरोना संशयित कोणाच्या समपर्कात आला तर मोठा अनर्थ घडू शकतो म्हणून हा कक्ष इतरत्र निर्माण करावा अशी त्यांनी एक निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन