बोर्डाद्वारे परभणीत सुनावणीची जत्रा ,महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांच्या रंगाच रांगा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी, पण बोर्डाद्वारे परभणीत सुनावणीची जत्रा ,महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांच्या रंगाच रांगा

परभणी, दि.13(प्रतिनिधी)- कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केली असतांना माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या औरंगाबाद बोर्डाने सोमवारी(दि.13) परभणीत इयत्ता 12 वीच्या परीक्षेत अवैध मार्गाच्या प्रकरणासह  रेस्टीकेट केलेल्या विद्यार्थ्यांना सुनावणीसाठी पाचारण केल्याने येथील शिवाजी महाविद्यालयाच्या एका वर्ग खोलीच्या परिसरात विद्यार्थ्यांसह पालकांची जत्राच उसळली.
वसमत रस्त्यावरील शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात काही विद्यार्थ्यांसह पालक आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी दुपारी बाराच्या सुमारास सहजपणे डोकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाविद्यालयाच्या वर्ग खोल्यात औरंगाबाद बोर्डातील अधिकारी, कर्मचारी हे विद्यार्थ्यां बरोबर हितगुज करीत असल्याचे निदर्शनास आले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी संचारबंदीच्या या काळात नेमके हे काय, चालूये असा प्रश्‍न केला असता बोर्डाच्या अधिकारी गांगरूणच गेले. यावेळी छायाचित्रासह व्हिडिओ क्लिप काढणा-या प्रतिनिधींना बोर्डाच्या या कर्मचा-यांनी रोखले. आपणास असे करता येणार नाही, असे म्हणत एकूण प्रकाराबाबत मौन बाळगले. वरिष्ठांचा मोबाईल नंबर द्या, असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी म्हटल्यानंतर त्या कर्मचा-यांचा गोंधळ उडाला. याप्रकाराबाबत प्रतिनिधींनी पालकांना हा प्रकार काय आहे हे विचारले असता, तेव्हा संचारबंदीत बोर्डाने सुरू केलेल्या सुनावणीच्या कार्यक्रमाचा उलगडा झाला.
याप्रकाराबाबत संभाजी सेना या सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी यांनी कार्यालय गाठून याप्रकाराबाबत एक लेखी निवेदन सादर केले. संचारबंदीच्या या काळात विद्यार्थी व पालक एका ठिकाणी बोलावल्या बद्दल आश्‍चर्य व्यक्त करीत इतरांच्या जीवाशी खेळणा-या औरंगाबाद बोर्डाच्या अधिका-यां विरोधात तात्काळ कठोर कारवाई करा, अशी मागणी संतप्त पदाधिका-यांनी या निवेदनाद्वारे केली.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन