नांदेड येथे रेल्वेने मालवाहतुक वाढवण्यासाठी केली व्यवसाय विकास युनिट ची स्थापना

रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ,नांदेड विभागाने मालवाहतूक भारनियमन वाढविण्यासाठी व्यवसाय विकास युनिट (बीएसयू) ची केली स्थापना

नांदेड (प्रतिनिधी):- नांदेड विभागाने मालवाहतूक भारनियमन वाढविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व्यवसाय विकास युनिट (बीएसयू) ची स्थापना केली आहे. कांदा, साखर, ड्राय ऑइल केक, मॅझेज इत्यादी पारंपारिक फ्रेट लोडिंगवर काम करण्याव्यतिरिक्त व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) हे रेल्वे मालवाहतूकातील बास्केटमध्ये अपारंपारिक रहदारी आणणे यासारख्या अपारंपरिक वाहतुकीवर भर देईल व त्याकरिता आवश्यक त्या उपाय योजना करण्यास तत्पर असेल याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे ज्यात श्रीधर नांदेडचे वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर, श्री पी. दिवाकर बाबू वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक, श्री उदयनाथ कोटाला  वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक आणि श्री शेख मोहम्मद अनीस वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता सदस्य असतील. समितीने संभाव्य ग्राहकांकडून नवीन प्रस्ताव शोधण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधणे हे समितीचे मुख्य कार्य असंणार आहे . समिती प्रस्तावाच्या व्यवहार्यतेचे विश्लेषण करेल आणि विद्यमान रहदारीचे जास्तीत जास्त लोडिंग करण्यासाठी आणि रेल्वेने वाहतुकीसाठी नवीन रहदारी आकर्षित करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक हस्तक्षेपाची पूर्तता करेल. याकरिता अधिक माहिती लागल्यास श्री. श्रीधर, नांदेडचे वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स नियंत्रण कार्यालय - 02462-223545 ईमेल पत्ता - sr.dom@ned.railnet.gov.in येथे सम्पर्क करावा असे दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन