माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मोटर सायकल अपघातात मृत्यू

माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मोटर सायकल  अपघातात मृत्यू



परभणी (प्रतिनिधी):- परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोटार सायकलच्या अपघातात माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मृत्यू झाला.
माजी आमदार मोहन फड यांचा पृथ्वीराज फड हा लहान मुलगा असून मुंबईत शिक्षण घेत होता,लॉक डाऊन मुळे तो परभणीत होता आज दि 10 जुलै संध्याकाळी पावणे नऊ च्या सुमारास पृथ्वीराज हा स्क्रॅमलर डुक्याटी या मोटारसायकल वरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर त्याच्या वाहनाचा अपघात झाला यामध्ये तो गंभीर जखमी झाला हा अपघात एवढा मोठा होता की त्याच्या मोटार सायकल चा समोरील भाग चक्काचूर झाला यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.नेमका हा अपघात कसा व कोणत्या वाहनसोबत झाला याचा तपास पोलीस करत आहेत
*टिळक रत्न वृत्त प्रतिनिधी*


Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त