गंगाखेड मधील त्या स्वागत समारंभातील सहभागी अधिका-यांवर पण कारवाई होणार का ?

गंगाखेड मधील त्या स्वागत समारंभातील सहभागी अधिका-यांवर पण कारवाई होणार का ?

परभणी, दि.13(प्रतिनिधी)-  गंगाखेड शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असतांना एका व्यापा-याने आयोजित केलेल्या स्वागत समारंभास जााणे
टाळणे सोडून उलट वेळ काढून उपस्थिती लावणा-या अधिका-यां विरोधात जिल्हा महसुल व पोलिस प्रशासन द्वारा काही कारवाई होणार का आणि कधी असे प्रश्न संचारबंदी मुळे त्रस्त नागरिक उपस्थित करत आहेत संपूर्ण जिल्ह्यात आपत्तकालीन स्थिती जमावबंदी धारा लागू असतांना गंगाखेडात मोठ्या समारंभाचे आयोजन करण्याचे धाडस केले गेले, कोणाच्या परवानगीने हे केले गेले, कार्यक्रमास मोठ्या संख्येने गर्दी झालेल्या या सोहळ्यात सरकारी अधिकारी, कर्मचारी पण बिनधास्तपणे सहभागी झाले होते.
या आधी अशाच प्रकारे पाथरीतील सामुहिक प्रार्थना प्रकरणात त्या गर्दी करण्यात येऊ नये होणारी गर्दी रोखण्या ऐवजी काहीही कारवाई न करणाऱ्या तेथे जबाबदार पोलीस कर्मचा-यांची जिल्हा पोलिस प्रशासनाने तडकाफडकी बदली करण्याची कारवाई केली होती.
असाच प्रकार गंगाखेड मध्ये घडला येथील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. हा वेग लक्षात घेता संपूर्ण परभणी जिल्हाच करोनाचे हॉटस्पॉट ठरतंय की काय अशी भीती आज सामान्य जनतेत निर्माण झाली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकार्‍यांवर कार्यवाही करून गुन्हे दाखल केले जाणार का असा सवाल विचारला जात आहे.
जिल्हा प्रशासनाने या स्वागत समारंभ आयोजकांवर गुन्हे दाखल केले असून आर्थिक दंड पण आकारला हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु गंगाखेडच्या शहरातील मध्यवस्ती मध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. आणि आयोजकांनी ती मागितली पण नाही. हे माहीत असताना ही तालुक्यातील सर्वच उच्च पदस्थ अधिकारी  या कार्यक्रमाला हजेरी लावतात व तेथील सुरुची भोजनाचा आनंद घेतात ही खरोखरच एक गंभीर बाब आहे. हा हलगर्जीपणा नसून गंगाखेडच्या जनतेला जाणीवपूर्वक करोना संक्रमणाच्या खाईत लोटण्याचा व जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला हरताळ फासनारा गंभीर गुन्हा आहे, यामुळें सामान्य नागरिकांचे हाल झाले असून संचारबंदीची नाहक शिक्षा सर्वाना भोगावी लागत आहे सदरील कार्यक्रमास उपस्थिती लावण्याऱ्या सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचेवर पण कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत

Comments

  1. सदरील प्रकरणात जिल्हाधिकारी साहेबांनी सदरील सर्वांना चांगलेच झाडले आहे ....बहुतेक कारवाई पण केली जाण्याची शक्यता आहे....अभिनंदन आपण बातमी देऊन जागृती केल्या बद्दल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन