10 तासात रेखाटले 1080 गणपतीचे आर्ट स्केचेस ,महाराष्ट्र बुक ऑफ रेकोर्ड मध्ये उपक्रमाची नोंद

दहा तासात बनवले १०८० गणेशा आर्ट स्केचेस                महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये  विक्रमाची नोंद  
मुंबई (प्रतिनिधी):- मनोहर शिवाजी बाविस्कर (जन्म ०१ मे १९७६) हे प्रगती विद्यालय बोरवली, मुंबई या शाळेतील एक उपक्रमशील कलाशिक्षक असून त्यांनी आपल्या २०-२१ वर्षाच्या अनुभवाच्या माध्यमातून १४ मे २०२० रोजी दहा तासात १०८० गणेशा आर्ट स्केचेस बनवून एक नवा आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला. सकाळी नऊ वाजता या उपक्रमाला त्यांनी प्रारंभ केला. सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या पण काही कालावधीनंतर सराव झाल्याने त्यांचे काम पुढे सुरळीत चालू राहिले. जेवण आणि इतर गोष्टीसाठी त्यांनी दर तीन तासांनी अर्धा तास वेळ घेतला. सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर ते आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. १०८० चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न  व काम चालू असताना त्यांच्या परिवाराने त्यांना बरीच मदत केली उदाहरणार्थ पाणी देणे, स्केच पेनने कलर देणे, लाईट, मोबाईल सिस्टम, व्हिडिओ चालू करणे या सर्व गोष्टींची त्यांनी त्यांना मदत केली. संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन कालावधी’ असल्यामुळे बाहेरून व्हिडिओ सिस्टम आणि कॅमेरा इत्यादी गोष्टी मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांचे काम चालू असताना मोबाईलच्याद्वारे व्हिडिओ शुटींग घेतलेले आहे. पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे मोबाईलमध्ये सर्वच गोष्टी व्हिडिओ होऊ शकल्या नाहीत. तरीही मोबाईल द्वारे त्यांनी एकूण सोळा व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून रेकोर्डिंग केलेले आहे. स्केचेस बनवण्याचे काम चालू असताना बाहेरून दैनिक लोकमत आणि दैनिक सकाळ या वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी देखील येऊन गेले व त्यांनी त्यांची मुलाखत घेतली व पाहणी केली.

ए फोर साईज व्हाईट पेपर, ब्लॅक मार्करस्, केच पेन, ब्लॅक कट स्केच पेन, स्केल, रेकॉर्डिंग करण्यासाठी मोबाईल इत्यादी साहित्य वापरून त्यांनी शेवटी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटापर्यंत १०८० चित्र त्यांनी पूर्ण केली.  कला विश्वातील अशा प्रकारचा हा पहिलाच विशेष उपक्रम ठरली असून. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची अर्थात आगळ्या-वेगळ्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या विक्रमाच्या निमित्ताने कलाशिक्षक मनोहर शिवाजी बाविस्कर म्हणाले, "माझ्या आयुष्यातील हा एक अनमोल क्षण असून या वेगळ्या उपक्रमाने टाळे बंदीतील माझ्या घरातील वास्तव्याचा सदुपयोग झाला आणि मला कला क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाली. सध्या कोरोनाव्हायरस आजारखूप गंभीर आहे. आणि या आजारामुळे लाक डाउनच्या सुट्ट्या आहे आणि या सुट्टीचा सदुपयोग व्हावा म्हणून मी हा उपक्रम हाती घेतला. हे विघ्न दूर व्हावे म्हणून मी विघ्नहर्ता गणपती बाप्पा या बाप्पांचे विविध चित्र याठिकाणी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे." त्यांच्या या विशेष उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन