कशी झाली नागठाणेकर महाराजांची हत्या वाचा सविस्तर वृत्त

कशी झाली नागठाणेकर महाराजांची हत्या वाचा सविस्तर वृत्त
सज्जनशक्तीवर दुर्जनांचा आघात बालतपस्वी निर्वाणरूद्र पशुपतींची धर्मभ्रष्ट माथेफिरूने केली हत्या !


नांदेड (प्रतिनिधी):- शिवसंस्कृतीचे प्रचारक आणि उमरी तालुक्यातील नागठाना मठाचे मठाधिपती बालतपस्वी श्रीगुरू निर्वाणरूद्र पशुपती शिवाचार्य महराजांची शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लिंगायत धर्माच्याच एका धर्मभ्रष्ट माथेफिरूने गळा दाबुन हत्या केली. साईनाथ लिंगाडे असे या माथेफिरूचे नांव असुन, महाराजांची हत्या केल्यानंतर तो फरार झाला आहे.
महाराजांच्या हत्येमागील स्पष्ट कारण अद्याप समोर अलेले नाही. मात्र घटनेच्या पार्श्वभूमी हाती आलेेलंयाा मााहितीनुसार महाराज नेहमी प्रमाणेच आपल्या रूममध्ये रात्री आराम करत असतांना रात्री १ च्या सुमारास साईनाथ लिंगाडे याने महाराजांच्या रूममध्ये प्रवेश करून तेथील महाराजांच्या पूजेसाठी असणार्‍य चांदीच्या काही वस्तु, सोनच्या अंगठ्या, विविध आभूूषणे आणि काही रोख रक्कम एका पिशवीत भरली. महाराजांना याची कुणकुण लागल्यानंतर ते जागे झाले असता लिंगाडे याने मोबाईल चार्जरच्या वायरने महाराजांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. घटनेनंतर आरोपीने मृत महाराजांना विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्यांच्याच गाडीच्या डिकीत टाकले व चोरलेल्या सर्व वस्तु घेऊन महाराजांची गाडी घेऊन पळून जात असताना गाडी मठाच्या गेटवर जाऊन आदळली. गाडीच्या आवाजाने मठातील लोक जागे झाले, त्यांनी हा प्रकार पाहून ग्रामस्थांनाही जागे केले. याच धावपळीत मठाच्या परिसरात असणार्‍या लोकांनी आरोपीला पकडले परंतु त्यांने तेथील लोकांवर चाकुहल्ला करून, महाराज आणि मुद्देमाल तिथेच सोडून तिथेच असलेल्या एका दुचाकीवरून पोबारा केला.
दरम्यान, तेथील जमावाने महाराजांना रूग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर गावचे सरपंच शिवाजी पचलिंग, पोलिस पाटील आणि अन्य काही मान्यवरांनी उमरी पोलिस ठाण्यात सदरील घटनेबाबत कळवले. उमरी पोलिसांनी या घटनेची रितसर नोंद घेऊन महाराजांचे शव शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवून दिले. या घटने दरम्यानच, एका व्यक्तीचे शव देखील मठाच्या मागील भागात पोलिसांना मिळून आले. हा  व्यक्ती चिंचाळा ता. उमरी येथील रहिवासी असून भगवान शिंदे असे त्याचे नांव आहे. तो  वेडसर असल्याचे ग्रामस्थांनी  सांगीतले.  एकाच रात्री काही वेळाच्या फरकाने मठाच्या परिसरात दोन जणांचा  खून करण्यात  आल्याने नागठाना परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन्ही घटनांचा पंचनामा करून उमरी पोलिसांनी आरोपी साईनाथ लिंगाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
बालतपस्वी निर्वाणरूद्र पशुपती शिवाचार्यांनी नागठाना गावचा पूर्ण कायापालट करून तेथे विविध सुविधा आणि शासनाच्या योजना कार्यान्वीत केल्या होत्या. त्यामुळे केवळ वीरशैव धर्मातच नव्हे तर या परिसरातील अठरापगड जातीधर्मामध्ये निर्वाणरूद्र पशुपतींना मोठे आदराचे स्थान होते. नुकताच त्यांनी गोशाळेचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी प्रशास्त असे बांधकामही केले. या बरोबरच महाराजांनी मठामध्ये गेल्या काही वर्षापासून अन्नछत्र देखील सुरू केले होते. आरोपी साईनाथ लिंगाडे हा नेहमी मठामध्येच असायचा. अन्नछत्रात नियमितपणे भोजन घ्यायचा. कधी कधी मठामध्येच मुक्कामाला देखील असायचा. साईनाथ हा लिंगायत समाजाचा असला तरी तो मुळातच गुंड प्रवृत्तीचा असल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगीतले असून यापुर्वीही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.  महाराजांच्या दैनंदिन व्यवहार आणि त्यांच्या दिनचर्येचा पूर्ण अभ्यास असलेल्या साईनाथने शेवटी आपला डाव साधलाच. शनिवारी मध्यरात्री मठामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने केलेल्या योजनेचा शेवट महाराजांच्या हत्येने झाला. निष्कलंक ब्रम्हचारी, कुशाग्रबुध्दीचा समाजसेवक, शिवसंस्कृतीच्या उपासकाचा अशा दुर्दैवी अंत व्हावा ही घटनाच मुळी मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या हत्येने संपूर्ण उमरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सदरील दुर्दैवी घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून, माणूसकीला काळीमा फासणारी घटना अ्रसे अनेक मान्यवरांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. दरम्यान नागठाणा येथील या घटनेचा वीरशैव माहेश्वर मंडळ मुंंबई, राज्यस्तीय जंगम समाजसंस्था समन्वय समिती, अखिल भारतीय शिवाचार्य सेवा समिती, महाराष्ट्र शिवाचार्य परिषद आणि पश्चिम महाराष्ट्र शिवाचार्य संघटना, परमरहस्य पारायण मंडळ, शिंगणापूर - धारेश्वर, जगद्गुरु पंचाचाय प्रकटदिनोत्सव समिती, सद्गुरु धारेश्वर सेवा समिती, संतशिरामणी मन्मथस्वामी जन्मोत्सव समिती, अखंड शिवनाम सप्ताह मंडळ, अ.भा.वीरशैव कीर्तन प्रवचनकार मंडळ, पश्चिम महाराष्ट्र मन्मथस्वामी रथोत्सव मंडळ, अ.भा.वीरशैव लिंगायत महासंघ, अ.भा.व महाराष्ट्रीय वीरमाहेश्वर जंगम पुरोहित संघटना, तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान वतनदार मठ धारेश्वर. सद्गुरू श्री मिस्कीनस्वामी मठ संस्थान माजलगांव, प्रभुप्रसाद परिवार महाराष्ट्र राज्य, श्री गणाचार्य मठ संस्थान मुखेड, श्री नागनाथ देवस्थान -जहागीरदार मठ संस्थान मानूूर, श्री कांचबसवेश्वर मठ संस्थान  पाथरी, श्री शंभुलिंग शिवाचार्य मठ संस्थान अंबाजोगाई, श्रीगुरू महालिंगेश्वर मठ संस्थान बर्दापूर, भांडारगृह इनामदार मठसंस्थान शिखर शिंगणापूर, वीरशैव लिंगायत मठ संस्थान, रायपाटण.ता.राजापूर. जि.रत्नागिरी. शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघना शाखा उमरी व महाराष्ट्रातील सर्व शिवाचार्य मठ संस्थान च्या वतीने निषेध करण्यात  आला असून बालतपस्वी निर्वाणरूद्र पशुपतींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे.
(कोण आहे हा साईनाथ लिंगाडे ? का केली त्याने महाराजांची हत्या ? या बाबत सविस्तर खुलासा प्रभूप्रसाद च्या पुढील अंकात करण्यात येईल.)

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन