श्री श.ब्र. १०८ शिवाचार्य नागठाणकार महाराज यांच्या हत्याचे पडसाद परभणीत उमटले...हल्लेखोरांना तात्काळ फाशी देण्याची मागणी

श्री श.ब्र. १०८ शिवाचार्य नागठाणकार महाराज यांच्या हत्याचे पडसाद परभणीत उमटले....तात्काळ फाशीच्या शिक्षेची मुख्यमंत्री कडे निवेदनाद्वारे मागणी

परभणी (प्रतिनिधी):- श्री श.ब्र.१०८ सदगुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य गुरुमाऊली नागठाणकर, उमरी मठ, जि. नांदेड यांची आज २४ मे रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली याचे पडसाद परभणीत उमटले परभणीत वीरशैव समाज वतीने मुख्यमंत्री याना निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला
या निवेदनात म्हणटले आहे की हल्लेखोर हे मठात घुसून मारत असतील तर ही बाब खुपच गंभीर आहे क्लेशदायक आहे. या आपत्कालीन परिस्थितीत साधु-संत आणि धर्मप्रचारकांवर हल्ले वाढत आहेत. 
साधु-संतावर होणारे हे हल्ले केवळ दु:खदच नव्हे तर ते चिंताजनक व संतापजनक आहेत. या बाबतीत  महाराष्ट्र राज्य शासनाने गंभीर पाऊले उचलली पाहीजेत. 
या जीवघेणा हल्ल्याचा तिव्र निषेध करण्यात आला आणि या प्रकरणाची सीआयडी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करून हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे केल्यास धर्मप्रचारक आणि महाराजांवर यापुढे हल्ले करण्याची कोणी हिंमत करणार नाही. अशी निवेदनात मागणी करण्यात आली असे न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडले जाईल असे कळविण्यात आले आले निवेदनावर डॉ. मदन लांडगे संस्थापक अध्यक्ष वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र, महेश स्वामी संस्थापक सदस्य वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र आदीच्या स्वाक्षरी आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन