मनपा हद्दीत प्रॉपर्टी नावे करून हवे, तर दे 4500 ....एसीबी ने केली अटक

मनपा हद्दीत प्रॉपर्टी नावे करून हवे असेल तर दे 4500 ....मनपा करनिरीक्षक ला एसीबीने पकडले रंगेहात

मनपा कर निरीक्षक पठाण शेरखान नूरखानला 11000 रुपये घेताना पकडले एसीबीने रंगेहाथ



परभणी (प्रतिनिधी) :येथील परभणी मनपा  प्रभाग समिती क चे करनिरीक्षक ह्यांचे कडे तक्रारदार गेले व आपल्या आईच्या नावाने मनपा हद्दीत स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे ती नावावर करून द्यावी ह्याबद्दल 11000 रुपये फिस लागेल असे सांगितले ते 11000 रुपये घेताना एसीबीने  मनपा करनिरीक्षक पठाण शेरखान नूरखान, वय 53 ह्याला रांगेहाथ पकडले 

याबाबत सविस्तर वृत्त असे तक्रारदारने आपल्या आईच्या नावाने परभणी मनपा हद्दीत स्थावर मालमत्ता खरेदी केली त्याकरिता लागणारे हस्तांतरण पत्र आईच्या नावाने मनपा द्वारे करायचे होते त्यांनी करनिरीक्षक आलोसे पठाण शेरखान नूरखान ह्यांना भेटले तर त्यांनी सदरील काम करणे करिता 11000 रुपये खर्च येतो ज्यात 6500 रुपये मनपाला भरायचे असतात व 4500 रुपये काम करणे करिता टेबलावर द्यावे लागतात तुरी असेल तर या काम करून देतो

सदरील बाब तक्रारदार ह्यांना पटली नाही त्यांनी एसीबीला सदरील प्रकार कळवळा पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे ह्यांचे मार्गदर्शन नुसार, पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर ह्यांनी सापळा तयार केला आज (04 जुलै) रोजी लाच मागणीची पंचा समक्ष पडताळणी केली त्यानुसार कारवाईला सुरुवात केली यावेळी तक्रारदार हे 11000 रुपये घेऊन मनपा कार्यलयात गेले त्यावेळी करनिरीक्षक पठाण ह्यांनी सदरील रक्कम पंचासमक्ष स्वीकारली तसेच तक्रारदार ह्यांनी 6500 ची शासकीय पावती मागितली तर त्यांनी पावती करिता 10 दिवस लागतील असे उत्तर दिले 6500 रुपये शासकीय फिस व 4500 रुपये लाच नगदी घेताना करनिरीक्षक पठाण ह्याला एसीबी पथकाने रांगेहाथ पकडले सदरील कारवाई यशस्वी करण्यासाठी पोह/मिलिंद हनुमंते, रविंद्र भूमकर, सिमा चाटे , अनिरुद्ध कुलकर्णी पोकॉ/ अतुल कदम, मो.जिब्राईल,शेख मुक्तार, राम घुले व चालक कदम अँटी करप्शन ब्युरो, परभणी.आदी सहभागी होते

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन