बीआरएस चा परभणीत मोर्चा सम्पन्न

 परभणीत भारत राष्ट्र समितीचा भव्य मोर्चा सम्पन्न 

केंद्रेकर यांचा अहवाल लागू करा : अन्य मागण्यांचाही समावेश 







 परभणी,दि.22(प्रतिनिधी) : सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तेलंगना मॉडेलवर आधारित शेतकरी आत्महत्येंच्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या अहवालाची त्वरीत अंमलबजावनी करावी यासह अन्य मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीने मंगळवारी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी तेलंगाना मॉडेल लागु करा या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव कदम यांच्या नेतृत्वाखाली धडकला .यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मराठवाड्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर विभागातील दहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले .या दहा लाख शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणात सुमारे चाळीस टक्के शेतकरी नैराश्यात असल्याचे तर एक लाख शेतकरी आर्थिक ताणामुळे आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचे आढळून आले. यावर उपाय योजना म्हणुन त्यांनी शेजारील तेलंगाना राज्यात तेथील मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांनी राबवलेल्या तेलंगाना मॉडेलवर आधारीत योजना सुचविल्या त्यात शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रु द्यावेत शेतीसाठी पाणी चोवीस तास वीज कर्जमाफी अशा अनेक उपाययोजना सुचवल्या .पण दुर्दैवाने राज्य सरकारने या अहवालास केराची टोपली दाखवली . हा अहवाल सरकारला मिळल्यानंतर मराठवाड्यात दररोज दहा हुन अधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्या शेतकरी पतीपत्नी यांनी सोबतच आत्महत्या करण्याचे प्रमाण ही वाढले आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील नाव्हलगाव येथे शेतकरी दांपत्याने एकत्र आत्महत्या केल्या नंतर भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी तेलंगाना मॉडेलवर आधारीत श्री सुनील केंद्रेकर यांचा अहवाल त्वरीत लागु करावा या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्याचा मोर्चा दि २२ ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केला होता . या मोर्चासाठी जिल्हाभरातील शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शहरात दाखल झाले. सुरुवातीला शेतकऱ्यांनी शहरातुन वाहानांची एक रॅली काढली व शनीवार बाजारातुन या मोर्चास सुरुवात झाली . हा मोर्चा मुळे शहरात गुलाबी वातावरण तयार झाले होत. हजारो शेतकरी गुलाबी झेंडे हातात घेऊन तेलंगाना मॉडेलवर आधारीत सुनील केंद्रेकर यांचा अहवाल त्वरीत लागु करा व इतर मागण्यांसाठी हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले या मोर्चात भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम,युवा आघाडीचे सुधीर बिंदू, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट,भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक पवन करवर,रमेश माने, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृतराव शिंदे,राम लटके,भगवान सानप,भगवान शिंदे,विश्वंभर गोरवे, बाळासाहेब आळणे, प्रकाश भोसले,मंचक सोळंके,जाफर तरोडेकर, रंगनाथ चोपडे, बाळासाहेब सामाले,कुलदीप करपे,विनोद पाटील,निळकंठ चाटे,प्रवीण फुके,कैलास येसगे,नवीन पाटील,गणेश पाटील यांच्या सह जिल्हाभरातील शेतकरी उपस्थित होते. फोटो :- तेलंगाना मॉडेल लागु करा या मागणीसाठी हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले





 माणिकराव कदम, पवन करवर, सुधीर बिंदु, अमृतराव शिंदे, रमेश माने, जाफर तरोडेकर, रंगनाथ चोपडे, भगवान शिंदे, बाळासाहेब आळणे, मंचकराव सोळंके, भगवान सानप, प्रा. प्रकाश भोसले, लक्ष्मण वायवळ, प्रविण फुके, अभिजित पाटील, शिवाजी गिरी, बाळासाहेब सामाले, कृष्णा चोपडे, विनोद पाटील, भास्करराव खांडे आदींच्या नेतृत्वाखालील निघालेल्या या मोर्चातील आंदोलनकर्त्यांनी शेतकर्‍यांना एकरी 10 हजार रुपये पेरणीपूर्व द्यावे, चोवीस तास योग्य दाबाने वीज पुरवठा करावा, शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध करावे, गावपातळीवरच शेतमालाची खरेदी करीत तात्काळ पैसे वितरीत करावे, शेतकर्‍यांना पाच लाखाचा जीवनविमा द्यावा, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते सहभागी होते.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन