22 ऑगस्ट रोजी -भारत राष्ट्र समितीचा परभणीत भव्य मोर्चा आयोजन

 22 ऑगस्ट रोजी बीआरएस चा परभणीत भव्य मोर्चा 

तेलंगणा राज्य प्रमाणे योजना महाराष्ट्र मध्ये लागू कराव्यात व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाची गँभिर दखल घ्यावी ह्या मागणी करिता व सरकारने त्यांचा अहवाल फेटाळला याचा निषेध करिता मोर्चाचे आयोजन 





परभणी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या शेतकरयांच्या आत्महत्या तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सरकार कडे सादर केलेला 1 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत अहवाल महाराष्ट्र सरकारने  फेटाळून लावला ही शेतकरी वर्गाकरिता घेतलेली शासनाची भूमिकेच्या विरोधात व तेलंगाणा राज्यात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना महाराष्ट्र राज्यात शेतकरी वर्गाला देण्यात याव्यात व सुनील केंद्रेकर यांनी सादर केलेला अहवाल राज्य सरकारने फेटाळून याचा निषेधार्थ बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीच्या वतीने परभणीत 22 ऑगस्ट 2023 रोजी शनिवार बाजार मैदान येथून दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करणयात आले आहे तसेच परभणीतील सर्व शेतकरी बांधवाना त्यांनी यावेळी आवाहन केले की शेतकरी हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदवावा व केंद्रेकर साहेबांनी जो अहवाल दिला त्यात ज्या काही उपाय योजना सुचवल्या त्याप्रमाणे शासनाने कारवाई करावी  अशी माहिती बीआरएस भारत राष्ट्र समिती किसान सेल महाराष्ट्र प्रदेश  अध्यक्ष  माणिक कदम यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली यावेळी बीआरेस चे राम लटके,रंगनाथ चोपडे,सुधीर बिंदू,भगवान सानप,जाफर तरोडेकर, बाबासाहेब समाले, मंचक सोळंके, बाळासाहेब आळणे, माऊली निर्वंळ, नारायण अवचार अमृत शिंदे आदि उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन