परभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा परतावा मंजूर - जिल्हा कृषी अधिकारी संतोष आळसे

परभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा परतावा मंजूर करण्यात आले आहेत 



परभणी (प्रतिनिधी ):- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन २०१९-२० मधील अंबिया बहारातील संत्रा, केळी, आंबा या फळविकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील १ हजार १०० शेतकऱ्यांना १ कोटी ८४ लाख ७५ हजार ८६९ रुपये विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली.पुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षी जिल्ह्यातील ३७ कर्जदार आणि १ हजार २८७ बिगर कर्जदार असे एकूण १ हजार ३२४ शेतकऱ्यांनी ४५ लाख ४८ हजार ४३४ विमा हप्तात भरुन १ हजार ८८.७९ हेक्टरवरील फळपिकांसाठी ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या हिश्शाचा प्रत्येकी २ कोटी ३१ लाख ३१ हजार ८६ रुपये तसेच शेतकऱ्यांचा ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपये मिळून एकूण ५ कोटी ८ लाख १० हजार ६०६ रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला होता. जिल्ह्यातील ११८ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ७ लाख ३ हजार २३० रुपये विमा हप्ता भरून १०६.५५ हेक्टरवरील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. आंबा उत्पादक३७ शेतकऱ्यांनी १ लाख ७४ हजार ८४५ रुपये विमा हप्ता भरून २८.९० हेक्टरवरील आंबा पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. मोसंबी उत्पादक १५८ शेतकऱ्यांनी ५ लाख २० हजार ७१३ रुपये विमा हप्ता भरून १३५.२५ हेक्टरवरील मोसंबी पीकविमा संरक्षित केले होते. संत्रा उत्पादक १ हजार ११ शेतकऱ्यांनी ३१ लाख ४९ हजार ६४७ रुपये विमा हप्ता भरून ८१८.०९ हेक्टरवरील संत्रा पिकांना विमा कवच घेतले होते. संत्रा, केळी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाला आहे.संत्रा पिकांच्या नुकसानी बद्दल बोरी, जिंतूर, मानवत, जांब, कात्नेश्वर या पाच मंडळांतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १९ हजार २५० रुपये तर पूर्णा या मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३८ हजार ५०० रुपये दराने विमापरतावा मंजूर झाला आहे.ऊती संवर्धित केळी पिकांच्या नुकसानी बद्दल पेडगाव, जांब (ता. परभणी), बोरी, सांवगी म्हाळसा (ता. जिंतूर), कुपटा (ता.सेलू), केकरजवळा (ता. मानवत), बाभळगाव (ता. पाथरी)आवलगाव (ता. सोनपेठ), महातपुरी (ता. गंगाखेड) नऊ मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३३ हजार रुपये दराने तर सिंगणापूर (ता. परभणी) आणि मानवत या दोन मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४१ हजार रुपये दराने विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.


Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन