परभणीत लॉक डाउन .... ? कोरोना बधितांची संख्या वाढतच चालली आहे..!

परभणीत कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी एक वेळ कडक लॉक डाउन हवाच ..!

लॉक डाउन केल्यावर घरोघर जाऊन थर्मल स्क्रीनींग व लागल्यास रॅपिड अँटिजेंन टेस्ट कराव्यात 

परभणी (प्रतिनिधी) :- परभणी हे राज्यातील सर्व प्रथम जिल्हा होता ज्याने सर्वात आधी लॉकडाउन लावले व जिल्हयाच्या सीमा बंद करून टाकल्या नागरिकांनी देखील सोशल डिस्टन्स पाळले अनवश्यक घरातून बाहेर पडणे टाळले स्वच्छतेचे पालन केले त्यामुळे बरेच महिने परभणी कोरोना संसर्ग मुक्त राहिली नन्तर जस जसे लॉकडाउन शिथिल केल्या जाऊ लागले तसं तसे परभणीत कोरोना बाधितांची ख्या वाढत जाताना दिसून आली गंगाखेड ने संसर्ग कसा वाढतो याची झलकच दाखवली नागरिकांनी देखील सर्व नियम पाळण्यात शिथिलता आणल्याने परभणीत 1 रुग्ण आढळून येत नव्हता तेथे दररोज किमान 50 च्या वर कोरोना संसर्ग बाधित रुग्ण  मििळून येेे आहेेेत.

पाहता पाहता परभणीत 3000 च्या वर कोरोना संसर्ग बाधित रुग्ण आढळून आले आणि ही संख्या वाढतच चालली आहेनागरिकांनी पण स्वतःचे कर्तव्य व कोरोना संसर्ग समबंधीत उपाय योजना पाळण्यात काटेकोरता पाळावी.

व्यापारी लोकांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट केली असता शेकडो व्यापारी कोरोना पोस्झिटिव्ह आढळून आले योग्यवेळी त्यांना उपचार देण्यात आले  पण आजही कुठेही पाहिले असता छोटे मोठे व्यावसायिक हातगाडेवाले हे ना मास्क वापरतात किंवा ना सॅनिटाईजर वापरतात बर यावर लक्ष देण्याकरिता सर्व सक्षम अधिकारी नियुक्त केले असताना देखील त्यांना ह्या गोष्टी नजरेत कशी पडली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे.

बर हे सर्व अधिकारी ज्या रस्त्याने आपापल्या कार्यालयात जातात त्याच रस्त्यावर हा प्रकार सर्रास चालू असताना कोणत्याही अधिकारी यावर कारवाई करण्याची तसदी घेत नाही त्यांनी जर दररोज यावर कारवाई करण्याची मानसिकता दाखवली तर कोरोना संसर्ग  प्रमाण खाली येण्यास नक्कीच मदत होईल. 

मनपा तर विचारायचे कामच नको अशी परिस्थिती आहे उपचार पेक्षा इलाज भयंकर असे हाल आहेत एक सांगतात एक दुर्लक्ष करतात शहर स्वच्छता निरीक्षक केवळ नावालाच आहेत की खरोखर आहेत हेच कळायला मार्ग उरला नाही कुठेही पहा धूळ कचरा फुटपाथ वर रस्त्यावर जागोजागी हातगाडीवाले व इतर प्रकारचे अतिक्रमण झाल्याने गर्दीचे होण्याचे  प्रमाण वाढले आहे सदरील प्रकार रोखण्यात यांना अधिकार आहेत की नाही किंवा ह्यांना का करावेसे वाटत नाही ह्याचे पण उत्तर मिळत नाहीये.

कोरोना सोडून सगळे काही मुक्त असावे असे सगळ्यांना वाटते पण कृती कोणीही करत नाहीये आता परभणीची आजची परिस्थिती पाहता कोरोनाला मुक्त वातावरण निर्माण करण्यात आले आहे असे चित्र दिसत आहे.

परभणीतील एकदा हा कोरोना संसर्ग बाधित रुग्णाचा चढता आलेख खाली आणण्याकरिता एकदा कडक व घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंग व  लागल्यास रॅपिड अँटिजेंन टेस्ट करण्यासहित लॉक डाउन हवाच.

  

 


Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन