SCR कडून 12 सप्टेंबर रोजी हैद्राबाद-परभणी-हैद्राबाद रेल्वे धावणार

 SCR कडून 12 सप्टेंबर रोजी हैद्राबाद-परभणी-हैद्राबाद रेल्वे धावणार



परभणी, (प्रतिनिधी)- देशातील अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून गेल्या बऱ्याच महिन्यांपासून बंद केलेल्या रेल्वेगाड्या हळूहळू सुरू करण्यात येवू लागल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने शनिवारी(दि.5) देशभरात एकूण 80 रेल्वेगाड्या 12 सप्टेेंबरपासून सुरू करण्याचे घोषित केले. यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे विभागातंर्गत परभणी ते हैद्राबाद(07564) व हैद्राबाद ते परभणी(07563) ही एक्सप्रेस विशेष गाडी म्हणून दररोज नांदेड मार्गे धावणार आहे.गाडी क्र. 07563 हैदराबाद-परभणी दैनंदिन विशेष रेल्वे हैदराबाद येथून रात्री 10.45 वाजता निघून सिकंदराबाद, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा मार्गावरून परभणी स्थानकावर दुस-या दिवशी सकाळी 6.30 ला पोहोचणार आहे.परतीत गाडी क्र. 07564 परभणी-हैदराबाद दैनंदिन विशेष रेल्वे परभणी स्थानकावरुन रात्री 10.30 वा निघून वरील मार्गाने हैदराबाद येथे दुस-या दिवशी सकाळी 6.45 वाजता पोहोचणार आहे. याकरिता 10 सप्टेंबरपासून आरक्षण सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डाने  परिपत्रका द्वारे घोषित केले.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन