कोविड 19 च्या आपद्ग्रस्त परिस्थितीत कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपस्थिती 100% हवी - राज्य सरकार, अधिकारी म्हणतात ही जबरदस्ती योग्य नाही

कोविड 19 च्या आपद्ग्रस्त परिस्थितीत कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपस्थिती 100% हवी - राज्य सरकार,
अधिकारी म्हणतात ही जबरदस्ती योग्य नाही , कोविडवर ठोस उपाययोजना केल्या शिवाय येणार नाही कार्यालयात आम्ही 

परभणी (प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्या वतीने कोविड 19 च्या आपद्ग्रस्त काळात राज्य कार्यालयात अधिकाऱ्यांच्या उपस्थिती 100% असावी असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे पण अमलबाजवणी होताना दिसून येत नाही यावर अधिकारी वर्गाचे कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की  कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ह्यात अनेक अधिकारी मृत्युमुखी देखील पडले आहेत यावर राज्य शासनाने कोणत्याही प्रकारे ठोस उपाय आद्यप पर्यंत केले नाहीत कसे काय आम्ही कार्यालयात 100% उपस्थित कसे रहायचे असा सवाल त्यांनी यावर उपस्थिती केला आहे.
अधिकारी वर्गाची 100% उपस्थिती राज्य शासनास हवी असल्यास एकदम सर्वांना वेठीस न धरता टप्याटप्याने वाढवण्यात यावी सर्व अधिकारी लोकांना विमा कवच देण्यात यावे कोविड 19 विशेष रजेचे प्रावधान मंजूर करावे व कोविडला तातडीच्या आजारात समावेश करावा क्षेत्रीय भेटी दरम्यान अधिकारी वर्गाला पी पी ई किट देण्यात यावेत तर आणि तरच 100% राज्य शासन अधिकारी कार्यालयात उपस्थित राहतील अन्यथा नाही असे निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ परभणी समनव्य समितीच्या मार्फ़त जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे निवेदनावर समितीच्या परभणी अध्यक्षा सौ मंजुषा मूथा व समितीचे परभणी सरचिटणीस डॉ पी आर पाटील , जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर सु दा सोळंके आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन