परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीसह तिघे साडेचार लाख रुपयांची लाच घेतांना ए सी बी च्या जाळ्यात

परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीसह तिघे साडेचार लाख रुपयांची लाच घेतांना ए सी बी ने पकडले ...

लाचलूचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई ः रंगेहात पकडले 




परभणी, दि. 8 (प्रतिनिधी) )ः येथील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, अभियंता हमीक अब्दूल खय्युम तसेच अव्वल कारकुन श्रीकांत करभाजने या तिघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या पथकाने साडेचार लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल मंगळवार दि08 सप्टेंबर रोजी दुपारी रंगेहात ताब्यात घेतले.

गंगाखेड येथील नगर पालिकेअंतर्गत विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत नगर परिषद विभागाने संबंधित नगरसेवकाच्या वतीने साडेचारलाख रुपयांची लाच मागीतली. तेव्हा संबंधितांनी याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. या ए सी बी च्या पथकाने काल सोमवार दि07 सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली तेंव्हा नगर पालिका प्रशासन विभागातील अव्वल कारकुन श्रीकांत विलासराम करभाजने, अभियंता अब्दूल हकीम अब्दूल खय्युम यांनी तक्रारकर्त्याकडून कामाच्या दीड टक्केप्रमाणे म्हणजे अंदाजे साडेचार लाख रुपये पंचासमक्ष मागणी केली. या व्यवहारास निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती वसंतराव सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष संमती दर्शवली. त्यानुसार पथकाने  मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. अव्वलकारकुन श्रीकांत करभाजन यांनी तक्रारकर्त्यास अब्दूल हकीम अब्दूल खय्युम यांना पैसे द्यावेत, असे नमुद केले. संबंधितांकडून पंचासमक्ष खय्युम यांनी ती साडेचार लाख रुपयांची लाच स्वीकारली. पाठोपाठ या पथकाने त्या दोघांना रकमेसह ताब्यात घेतले. आणि तिन्हीही आरोपीस स्वीकारलेल्या रकमेसह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.

तसेच आणखी कोणास जर ह्यांनी कामाकरिता पैसे मागितले असल्यास अशा सर्व लोकांनी लाप्रवी कडे त्वरित तक्रार द्याव्यातअसे आवाहन करण्यात आले आहे 

या कारवाईत या विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलिस निरीक्षक अतुल कडू, जमीलोद्दीन जागीरदार, शेख शकील, अनिल कटारे, माणिक चट्टे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, शेख मुखीद, सारिका टेहरे, मुक्तार, जनार्धन कदम, रमेश चौधरी यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन