परभणीचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल ह्यांनी काढले कर्मचारी बदलीचे आदेश

 एकाच जागी सहावर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ▪️जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काढले आदेश

 परभणी, दि. 9 – ज्या कर्मचाऱ्यांच्या एकाच ठिकाणी सहावर्षापेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी केल्या. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समुपदेशन करुन पात्र कर्मचारी यांच्या बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात आदेश दिले. आपल्याला उपलब्धतेनुसार कर्मचाऱ्यांना मनाजोगे ठिकाण मिळालेले आहे. नवीन ठिकाणी बदली झालेले कर्मचारी यापुढेही चांगली सेवा बाजावतील असा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला. बदली झाल्यामध्ये सहा वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेले मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, लिपिक यांचा समावेश आहे. कर्मचारी उपलब्धतेनुसार ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणीकर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी निवड मंडळाचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, सदस्य तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सदस्य तथा उपजिल्हाधिकारी सामान्य संजय कुंडेटकर उपस्थित होते. यासाठी संगणक सहकार्य जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर, प्रोग्राम मॅनेजर निरज धावनगावे यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त