शिवसेनेची आपत्ती काळात रुग्णांकरिता गुलाबी रिक्षा सेवा सुरू

ठाणे येथे रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या गुलाबी रिक्शा

ठाणे (वृत्तसंस्था) – देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने रस्त्यावरील वाहतूकव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णाईत व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठीही वाहने उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत रुग्ण सेवेविना राहू नयेत म्हणून ठाणे जिल्हा शिवसेनेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ठाणे शहरातील रुग्णांच्या साहाय्याला शिवसेनेच्या गुुुलाबी रिक्शा रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रशासनाने २५ गुुुलाबी रिक्शा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना दूरध्वनीद्वारे या रिक्शांसाठी मागणी नोंदवता येईल. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून ही सेवा दिली जात आहे.ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट, माजिवडा विभाग, कॅडबरी परिसर, टेंभी नाका परिसर आदी ठिकाणी या गुुुलाबी रिक्शा रुग्णांना सेवा देणार आहेत. प्रतिदिन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही सेवा चालू रहाणार आहे. ज्यांना खरच आवश्यकता आहे, अशा रुग्णांनी विनायक सुर्वे यांना ९९६७३ १२१७६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील याावेळी करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन