आमदारांच्या PA ला 25 हजार पगार तर ....ड्रायव्हरची मजा .....आता सरकारी पगार मिळणार


मुंबई (वृत्तसंस्था):-  आमदारांच्या वाहनचालकाला देखील आता दरमहा 15 हजार रुपये वेतन मिळणार आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. त्‍यामुळे या अधिवेशनात आमदारांच्या विकासनिधीतही एक कोटींनी वाढ होऊन तो आता तीन कोटी रुपये झाला आहे.
आमदारांच्या वाहनचालकांचाही पगार आता सरकार देणार आहे. यामुळे सरकारवर दरवर्षी 6.60 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडलं.
आधी स्वीय सहायकाला दरमहा 15 हजार रुपये पगार मिळायचा. मागच्या सरकारने त्‍यात वाढ करून तो 25 हजार रुपये केला. वाहनचालकाला देखील सरकारने पगार द्यावा, अशी आमदारांची मागणी होती. त्‍याला अनुसरून हे विधेयक मांडण्यात आलं. एकमताने ते मंजूरही करण्यात आलं आहे.

Comments

  1. बातमी चांगली आहे, पण जनतेच्या पैशातून एवढे सारे आदीच खर्च होत असताना पुन्हा ही नवीन मलाई सार्या आमदारांना दिली म्हणून जनतेचा काय फायदा होणार ? याचा विचार झालाच पाहिजे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन