शहरातील खाद्य पदार्थांचे ठेले व गाडे बनताहेत मद्यपीचे मिनी वाईनबार

*शहरातील खाद्य पदार्थांचे ठेले व गाडे बनताहेत मिनी वाईनबार*
परभणी शहरात रस्त्याच्या कड्याला अनेक खाद्य पदार्थांच्या गाड्यांची चांगलीच संख्या दिसून येते. त्या गाड्यांवर जावून नागरिक सुद्धा आपल्या जिभेचे लाड पुर्ण करतात. अशाच गाड्यांमध्ये अनेक ठिकाणी अंडाभुर्जीच्या गाड्या सुद्धा लागतात. परंतु, या अंडाभुर्जी विक्रेत्यांकडून ग्राहकांना त्यांच्या दुकानाजवळ टाकण्यात आलेल्या बाकड्यांवर बसून खुलेआम मद्य पिण्याची मुभा देण्यात येते. त्यामुळे या चायनीज  व अंडाभुर्जीच्या गाड्या दिवसेंदिवस अनधिकृतरित्या मिनी वाईनबारच होत असल्याचे चित्र शहरातून दिसत आहे .बेरोजगारीचे  प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे. शिक्षण घेवूनही नोकर्‍या मिळत नसल्याने अनेकांनी हातगाड्यांवर विविध धंदे करायला सुरुवात केली आहे. कोणी फळे विकतो, कोणी भाजीपाला, कोणी कपडे तर कोणी खाद्यपदार्थ विकतात. जास्तीचे पैसे कसे मिळतील याकडे त्यांचा सर्वाधिक लक्ष असल्याने, आपल्याकडून अवैध धंदे होत आहेत, याची पुसटशीही कल्पना याना नसते. त्यातून अवैध धंदे दिवसेंदिवस भररस्त्यावर वाढताना दिसत आहे.
काही बेरोजगारांनी खाद्य पदार्थांबरोबरच चायनीज व अंडा भुर्जीच्या गाड्या सुद्धा लावलेल्या आहेत. या विक्री व्यवसायातून दोन पैसे मिळविणे हा त्यांचा उद्देश असतो. परंतु त्यांच्याकडे येणार्‍या बर्‍याच ग्राहकांना त्यांच्याकडून मद्य पिण्याची मुभा खुल्या रस्त्यांवर दिली जाते.
*बारमध्ये मद्य पिण्यास गेल्यावर त्याठिकाणी सर्व्हीस चार्ज बरोबरच मद्याची अधिक किंमत सुद्धा ग्राहकांना द्यावी लागते*. थोडाफार पैसा वाचविण्यासाठी अशा मद्यपिंकडून वाईन शॉपमधून मद्य विकत घेवून ते सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या अशा काही चायनीज व अंडाभुर्जीच्या गाड्यांवर जातात. त्याठिकाणी मद्य पिण्याबरोबरच त्यांच्याकडून खाण्यासाठी काही तरी विकत घेतले जाते. आपल्यालाल दोन पैसे मिळतात यामुळेच तो विक्रेता त्या मद्यपिंना हटकत नाही.
विक्रेत्याचा असाही डबल धंदा
मद्यपिंकडून मदीरा पोटात रिचवल्यानंतर सोबत आणलेली दारुची खाली बाटली तिथेच टाकली जाते. दररोज अशा शेकडो बाटल्या त्या चायनीज अंडाभुर्जी विक्रेत्याकडे जमा होतात. त्याखाली बाटल्या विकून सुद्धा त्याला दोन पैसे मिळतात. चायनीज व अंडाभुर्जीच्या ठेल्यांच्या आजू-बाजूला अनेक अन्य पदार्थांचे ठेले सुद्धा असतात. त्याठिकाणी अनेक जण सहकुटुंब येतात. या सर्व प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने या गाड्यांची तपासणी करून अश्या सार्वजनिक ठिकाणी खुलेआम पणे दारू पिणाऱ्या मद्यपीवर कडक कारवाई करावी ही मागणी नागरिक करत आहेत
*संपादक टिळक रत्न*

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन